आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेला लाथ कशी मारायची हे शिकवण्यास शिवसेनेला गाढव देणार; धनंजय मुंडेंचे वक्तव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- वारंवार सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देणाऱ्या शिवसेनेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चांगलाच टोला आणला आहे. मी शिवसेनेकडे जाताना गाढव घेऊन जाणार आहे. गाढव कशी लाथ मारतो हे त्यांना दाखवणार असून यामुळे शिवसेना सत्तेला लाथ कशी मारायची हे शिकेल, असे त्यांनी म्हटले आहे.

 

धरणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीर सभा घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजप व शिवसेनेवर टीका केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी जशी गाय घेऊन जाणार आहे, तसेच शिवसेनेकडे एक गाढव घेऊन जाणार आहे. हे दाखवायला की गाढव कशी लाथ मारतो. म्हणजे शिवसेना सत्तेला लाथ कशी मारावी लागते हे शिकेल, असे त्यांनी सांगितले. भाजप, मोदी आणि त्यांची आश्वासने आता चौकाचौकात चेष्टेचा विषय बनली आहेत. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...