आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँक भरती लटकली; कर्मचारी भरतीच्या प्रश्नावर अद्याप ताेडगा नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्य सहकारी बँकेकडे पीक कर्ज वितरणासाठी यावर्षी १ हजार काेटी रूपयांची मागणी केली अाहे. कर्जाची पीकनिहाय पतमर्यादा वाढविण्यासाठी जिल्हा बँकेला अतिरिक्त निधीची गरज भासणार अाहे. दरम्यान, तब्बल तीन वर्षापूर्वी राज्य शासनाने परवानगी देऊनही जिल्हा बँकेने कर्मचारी भरतीबाबत सकारात्मक निर्णय घेतला नसल्याने भरती प्रक्रिया लटकली आहे. शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत देखील भरतीच्या विषयावर निर्णय हाेऊ शकला नाही. 


जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक शनिवारी अायाेजित करण्यात अाली हाेती. मधुकर सहकारी साखर कारखान्याला कर्ज देणे, वसंत सहकारी साखर कारखान्याची बेलगंगा कारखान्याप्रमाणे विक्री करणे या विषयावर संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. जिल्हा बँकेमध्ये ३० वर्षापासून भरती बंद असतांना अनेक कर्मचारी प्रत्येक महिन्यामध्ये सेवानिवृत्त हाेत अाहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या भरतीचा विषय संचालकांनी उपस्थित केला. या वर्षात अहमदनगर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलेली कर्मचारी भरती वादाच्या भाेवऱ्यात सापडल्यामुळे जळगाव जिल्हा बँकेने देखील सावध भूमिका घेत भरती लांबणीवर टाकली अाहे. या बैठकीत देखील भरतीबाबत पुढील प्रक्रिया राबवण्याबाबत काेणताही निर्णय झाला नाही. 


बंद शाखा सुरू करण्याची मागणी 
जिल्हा सहकारी बँकेने जिल्ह्यातील ताेट्यात असलेल्या १० शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला हाेता. या शाखा बंद केल्यास त्या भागातील शेतकऱ्यांना अडचणींना सामाेरे जावे लागणार अाहे. बँकेशी संबधित कामकाज हाेऊ शकत नसल्याने शेतकऱ्यांचा वेळही खर्ची पडताे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेवून या शाखा सुरू ठेवण्याची अाग्रही मागणी जेष्ठ संचालक तथा माजी अामदार चिमणराव पाटील यांनी केली. इतर संचालकांनी देखील या शाखा सुरू ठेवण्याची मागणी केली. बेलगंगा सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीच्या यशस्वी प्रयाेगानंतर अाता कासाेदा येथील वसंत साखर कारखाना ही विक्री करण्याचा विषय उपस्थित करण्यात अाला. 


४३४ काेटींची कर्जमाफी 
जिल्ह्यात चार टप्प्यांमध्ये सहकार विभागाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या ग्रीन लिस्टमध्ये ८७ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ४३४ काेटी रूपयांची रक्कम जमा केली अाहे. तर नियमित कर्जफेड करणाऱ्या ४५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची ११९ काेटी रूपयांची रक्कम जमा करण्यात अाली अाहे. दरम्यान, चाैथ्या यादीतील घाेळानंतर सहकार विभागाने बँकेकडून चाैथ्या यादीचे शेतकऱ्यांच्या नावा जमा केलेले पैसे परत घेण्याच्या सूचना केल्या अाहेत. याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. चाैथ्या ग्रीन लिस्टचा प्रश्न अजूनही सुटत नसल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर असल्याचे मत संचालकांनी मांडले. 

बातम्या आणखी आहेत...