आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मुन्नाभाई'च्या साथीदाराला स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अाैरंगाबादेत केली अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पेपर सोडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या मदन महाजन डेडवाल (वय २१, रा. जोडवाडी, जि. औरंगाबाद) याला पाेलिसांनी १९ एप्रिल २०१८ रोजी अटक केली होती. औरंगाबाद येथून त्याला मोबाइलवरून उत्तरे सांगण्यास सज्ज साथीदार रतन प्रेमसिंग बहुरे (रा.जोडवाडी, जि.औरंगाबाद) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी जोडवाडीत अटक केली. 


बहुरे हा पाच वर्षे सैन्यदलात नोकरीस हाेता. नोकरी सोडल्यानंरत त्याने राज्यात काही ठिकाणी अशाच प्रकारे गुन्हे केले असल्याची माहिती समोर आली आहे. डेडवाल व बहुरे यांच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ एप्रिल रोजी जिल्हा पोलिस दलासाठी भरती प्रक्रीयेची लेखी परीक्षा असताना डेडवाल याने उजव्या हाताच्या डंडाला इलेक्टॉनिक्स डिव्हाइस तर कानात इयर फोन बसवले होते. बहुर हा त्याला उत्तरे सांगणार होता. तत्पूर्वीच मेटल डिटेक्टरमधून प्रवेश करताच बीप वाजल्यामुळे त्याचे बिंग फुटले होते. घटनेच्या दिवसापासून बहुरे बेपत्ता झाला होता. त्याने ५३ दिवस पोलिसांना गुंगार दिला. 


सोमवारी रात्री तो मुळ गावी जोडवाडी येथे आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक सुनिल कुराडे, सहायक निरीक्षक रवींद्र बागुल, रवींद्र पाटील, विकास वाघ, विनोद पाटील, प्रकाश महाजन, गफुर तडवी, अशरफ शेख, प्रवीण हिवराळे, सतीश गवळी व दत्तात्रय बडगुजर यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी जोडवाडी येथे सापळा रचला. त्यात त्याला अटक केली. 


यवतमाळ, बुलडाण्यातही गुन्हे दाखल 
रतन बहुरे हा पाच वर्षे सैन्यदालात नोकरीस होता. त्यानंतर त्याने नोकरी सोडून पोलिस भरतीच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार करण्याचा सपाटा सुरू केला होता. त्याच्याविरुद्ध जळगावशिवाय यवतमाळ व बुलडाणा येथे अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. 

बातम्या आणखी आहेत...