आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाढत्या तापमानाचा जळगावात फटका; उष्माघाताने एकाचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव जिल्ह्यात वाढलेल्या तापमानाचा फटका नागरिकांना बसत अाहे. जलारामनगरमधील गजानन केशव टेंभुर्णे (वय ५५) यांचा उष्माघातामुळे शनिवारी मृत्यू झाला. 


पाचोरा तालुक्यातील आसनखेडा येथील नातेवाइकाच्या लग्नाला हजेरी लावून टेंभुर्णे हे जळगावकडे परत येत हाेते. दुपारी ४.३० वाजता कंजरवाड्याजवळ दुचाकीवरून ते पडले. त्यांना लागलीच उलटीदेखील झाली. 


रिक्षाचालकांची मुजाेरी 
टेंभुर्णे यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नागरिकांनी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र एकही रिक्षा चालक थांबत नव्हता. या वेळी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झंवर यांनी रिक्षाचा मार्ग अडवला. तसेच टेंभुर्णे यांना रुग्णालयात न नेल्यास रिक्षाचा काच फोडण्याची धमकी दिली. त्यानंतर रिक्षाचालक तयार झाले. मात्र, तोपर्यंत टेंभुर्णे यांचा मृत्यू झाला होता. 

बातम्या आणखी आहेत...