आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅक्टर-दुचाकीचा अपघात: बहिणीच्या लग्नासाठी साज घेऊन जाणारा युवक ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोदवड/भुसावळ- मावस बहिणीच्या लग्नाचा साज (शृंगाराचे साहित्य) घेऊन जाणाऱ्या युवकाचा अपघाताच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी १०.४५ वाजता, बोदवड जामनेर रोडवरील शासकीय गोदामाजवळ घडली. 


एरंडोल येथील राहुल अनिल महाजन (वय २०) हा युवक मोटरसायकलने (क्र. एमएच.१२-एम.पी.६९१०) शेलवड येथील मावसबहिणीच्या लग्नाचा साज घेऊन शेलवडकडे जात होता. दुचाकी राहुल आत्माराम माळी (वय २०, रा.जळगाव) हा युवक चालवत होता. समोरुन येणाऱ्या ट्रॅक्टरने (क्र.एमएच.१९ क्यू. ७३७०) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात पाठीमागे बसलेला राहुल महाजन याच्या डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक राहुल माळी किरकोळ जखमी झाला. ट्रॅक्टरचालक गोपाळ धनराज पाटील (वय २९ रा. केकतनिंभोरा, ता.जामनेर) याला बोदवड पोलिसांनी अटक करुन गुन्हा दाखल केला आहे. 


लग्न साध्या पद्धतीने 
बोदवड ग्रामीण रुग्णालयात डॉ.राजेश बारगळे यांनी मृताचे शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मावसभावाचा अपघाती मृत्यू झाल्याने लग्न घरी दुःखाचा डोंगर कोसळला. त्यामुळे लग्नविधी साध्या पध्दतीने आटोपण्यात आले. या घटनेमुळे शेलवड गावात हळहळ व्यक्त झाली. 


महावितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी 
अपघातातील मृत राहुलच्या पश्चात दोन विवाहित बहिणी आई, वडील असा परिवार आहे. त्याचे वडील एका हाताने अपंग असून रसवंतीवर काम करतात तर आई शेतमजूर आहे. राहुलने आयटीआयचे शिक्षण घेतले होते. तो सध्या धुळे येथे महावितरण कंपनीत चार महिन्यांपासून प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होता. 

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...