आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायावल - शहरातील खाटीक वाड्यातील एका तरुणाकडे रिव्हाॅल्वर असल्याच्या गोपनीय माहितीवरुन पोलिसांनी शुक्रवारी त्याच्या घरावर छापा मारला. मात्र, आढळून आलेली पिस्तूल ही छऱ्यांची होती. तरीही या या तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरात रिव्हाॅल्वर आढळल्याच्या अफवेने खळबळ उडाली होती.
ही कारवाई अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गालगतच्या खाटीकवाडा परिसरात झाली. या भागात एक तरुण आपल्या भावा सोबत राहत असून तो गावठी रिव्हाॅल्वर बाळगतो, अशी गुप्त माहिती यावल पोलिस निरीक्षक डी. के. परदेशी यांना मिळाली होती. त्यावरुन रात्री १० वाजेच्या सुमारास हवालदार गोरख पाटील, रा.का. पाटील यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा खाटीक वाड्यात दाखल झाला. संशयित तरुणाच्या घराच्या चौघं बाजूने सिनेस्टाइल सापळा लावण्यात आला. तरुणाच्या घराचे दार ठोठावण्यात आले, तेव्हा तो तरुण झोपेतून उठला होता. तरुणाने जसे दार उघडले तसे त्यास हवालदार गोरख पाटील तीन पोलिसांनी पकडले. रिव्हाॅल्वरसंदर्भात विचारणा केली असता त्याने अजमेर (राजस्थान) येथून आणलेली छरे उडवणारी पिस्तूल पोलिसांना काढून दिली. पोलिसांच्या या ताफ्यामुळे परिसरातील रहिवाशांची गर्दी उसळली. रिव्हाॅल्वर सापडल्याची अफवा शहरात पसरली आणि ते बघण्यासाठी नागरिकांची पोलिस ठाण्यात गर्दी उसळली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.