आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचोपडा (जळगाव)- कृष्णापूर येथील 14 शेतमजुरांना विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉ. मनोज पाटील, डॉ. सपना पाटील, डॉ. शरद पाटील, डॉ. पंकज पाटील यांनी तात्काळ त्यांच्यावर उपचार केले. उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोज पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.
कृष्णापूर येथील सर्जना नारायण बारेला(13), निकिता नीबा बारेला(12), इंदूबाई मूलचंद ढिवरे(35), नंदिनी आनंदा अहिरे(12), ममता गेंमला बारेला(12), वैशाली समाधान बारेला (28), समाधान दानकु घोलप(30), अविनाश दिलीप अहिरे (12), रंजना छत्रगुण घोलप (20) नंदिनी महेंद्र शिरसाठ (25), दिलीप ज्ञानेश्वर शिरसाठ (26), मनिषा ज्ञानेश्वर शिरसाठ (19), सुमनबाई रामदास अहिरे(65), निलाबाई प्रकाश घोलप (30) हे शेतात कापूस वेचण्यासाठी गेले असता शेतात कुंडातील पाणी पिल्याने त्यांना उलट्या, मळमळ, अतिसार असा त्रास झाला. शेतमालक सीताराम पाटील यांनी त्यांना उपचारासाठी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. आमदार चंद्रकांत सोनवणे, शिवसेनचे शहरप्रमुख व नगरसेवक महेंद्र धनगर यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी बबिता कमलापुरकर, जि. परिषदेचे आरोग्य सभापती दिलीप पाटील, चोसाका व्हाईस चेअरमन शशिकांत देवरे, अधीक्षक डॉ. मनोज पाटील, डॉ पंकज पाटील यांनी समक्ष रुग्णांची विचारपूस केली.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.