आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या रेल्वेखाली झोकून पाेलिस कर्मचाऱ्याने केली अात्महत्या, अकस्मात मृत्यूची नोंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत पाेलिस कर्मचाऱ्याने अात्महत्या केल्याची घटना मंगळावारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. अात्महत्या केलेल्या पाेलिसाचे नाव जितेंद्र देवराम सोनवणे (वय-२८, रा. खोटेनगर) अाहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


जितेंद्र सोनवणे हे वरणगाव पोलिस ठाण्यात कार्यरत होते. मंगळवारी त्यांनी जळगाव-शिरसोली रेल्वेलाइनवरील खांबा क्रमांक ४१४/२७-२९ दरम्यान धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. ओळख पटल्यानंतर मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले. येथे मृत जितेंद्र यांच्या नातेवाईकांची आक्रोश केला. 

बातम्या आणखी आहेत...