आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात काहीही हाेवाे, जळगाव पालिकेत भाजप-शिवसेना युती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महाराष्ट्राच्या राजकारणात युतीसंदर्भात काहीही निर्णय हाेवाे, परंतु जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना व भाजपची युती करूया, असा थेट प्रस्ताव माजी मंत्री सुरेश जैन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला अाहे. यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद देत युतीच्या निर्णयासाठी लवकरच बसून चर्चा करू, असे अाश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती जैन यांनी जळगावात अायाेजित जाहीर कार्यक्रमात दिली. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या नजरा बैठकीकडे लागल्या अाहेत. 


सहा महिन्यांनी महापालिकेची सार्वत्रिक निवडणुक हाेणार अाहे. त्यादृष्टीने शहरातील राजकीय वातावरण अातापासून तापायला सुरूवात झाली अाहे. शहरातील पीपीपी तत्वावरील तसेच लोकसहभागातून सुरू असलेल्या विकास कामांना गती अाली अाहे. शनिवारी महापालिकेच्या मालकीच्या काेकीळ गुरूजी अॅक्वा-स्पा जलतरण तलावाचे उद‌्घाटन माजी अामदार सुरेश जैन यांच्या हस्ते झाले. उर्वरित.पान ४ 


बुलढाण्यात केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा 
महाराष्ट्र दुष्काळ मुक्त अभियान प्रकल्पाच्या उद‌्घाटनासाठी शनिवारी बुलडाणा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अाले हाेते. भारतीय जैन संघटनेच्या पथदर्शी कार्यक्रमाची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात अाली. या कार्यक्रमासाठी सुरेश जैन देखील उपस्थित हाेते. कार्यक्रमानंतर जेवण करताना मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सुरेश जैन यांनी युतीचा प्रस्ताव दिल्याचे खुद्द जैन यांनीच सांगितले. महाराष्ट्राच्या राजकारणात युतीबाबत काहीही निर्णय हाेवाे, मात्र जळगाव महापालिका निवडणुकीत शिवसेना व भाजपची युती करूया, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला अाहे. जैन यांच्या प्रस्तावानंतर युती संदर्भात लवकरच बसून चर्चा करू, असे मुख्यमंत्री म्हणाले, अशी माहिती जैन यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...