आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जळगाव- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक भवनात २०१४मध्ये एमएस्सीच्या विद्यार्थीनीवर एकाने अत्याचार केले होते. तर एक परदेशी महिलेने या तरुणास मदत केली होती. या दोघांना औरंगाबाद खंडपीठाने दोषी धरत दिड वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली.
अला अब्दुल रहिम मोहम्मद (वय २७, रा. आैरंगाबाद) व परवीन वेसी बिरगोनी शहा हुसेन (वय ४८, रा. आनंदनगर, पुणे) असे शिक्षा झालेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. अाैरंगाबादचा अब्दुल हा उमविच्या शिक्षक भवनात खोली करून राहत हाेता. तर परवीन वेसी हिने पीएच.डी.चा नावाने विद्यापीठातील शिक्षक भवनात खोली मिळवली होती. यानंतर याच खोलीत विद्यार्थीनीला गुंगीचे औषध देऊन त्यांनी अत्याचार केले होते. या प्रकरणी पाळधी आऊट पोस्टमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, जिल्हा न्यायालयात या खटल्याचे काम होऊन न्यायालयाने दोघांची निर्दोष मुक्तता केला होती. यानंतर सरकारी वकील गोपाळ जळमकर यांनी विधी व न्याय विभागाच्या सहाय्यक सचिवांकडे परवानगी मागून हा खटला उच्च न्यायालयात चालवण्याची विनंती केली हाेती. त्यानुसार औरंगाबाद उच्च न्यायालयात खटल्याचे कामकाज झाले. सुनावणी अंती न्यायालयाने अब्दुल याला विनयभंगाच्या आरोपात तर परवीन वेसी हिला दोषी धरले. या दोघांनाही न्यायालयाने दिड वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली अाहे.
आधीच भोगली शिक्षा
अब्दुल व परवीन या दोघांना अटक झाल्यानंतर ते दोघे न्यायालयीन कोठडीत असताना सुमारे दिड वर्षे कारागृहात होते. कोठडी दरम्यान ते जेवढे दिवस कारागृहात राहिले तेवढ्या कारावासाची शिक्षा उच्च न्यायालयाने त्यांना ठोठावली आहे. त्यामुळे त्यांना निकालानंतर पुन्हा कारागृहात जाण्याची गरज नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.