आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमध्ये संभाजी ब्रिगेड, शेतकरी संघटनेचे एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल (जळगाव)- येथील पंचायत समितीच्या कार्यालयासमोर सोमवारी (दि.19) शेतकरी संघटना व संभाजी ब्रिगेडच्या वतीने देशातील पहिल्या शेतकरी आत्महत्येला 32 वर्ष झाल्यानिमित्त एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. तर संभाजी ब्रिगेडकडून स्वराज्य संकल्प अभियानाची सुरूवात करण्यात आली. संपुर्ण जिल्ह्यात विनाअट शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्याकरीता रथयात्रा निघाली आहे.

 

 

देशातील पहिली शेतकरी सामुहिक आत्महत्या 19 मार्च 1986 रोजी चिल गव्हाण (जि. यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे, त्यांची पत्नी मालती व 4 मुलं यांनी पवनारजवळील दत्तपुर येथे केली. ही पहिली शेतकरी सामूहिक आत्महत्या मानली जाते. तेव्हापासुन आजवर लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या घटनेला 19 मार्च रोजी 32 वर्ष पुर्ण होत असल्याने शेतकरी संघटनेचे खान्देश विभाग प्रमुख कडूअप्पा पाटील, तालुकाध्यक्ष विश्वासराव शांताराम पाटील, संभाजी ब्रिगेडचे जळगाव पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष संजीव हिरामण सोनवणे, प्रकाश पाटील, डॉ. अनिल पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष विजय पाटील-किनगावकर, अजय पाटील, तुषार उगले, पंचायत समितीचे उपसभापती उमाकांत पाटील, दिनकर क्षिरसागर, अविनाश बाविस्कर, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष देवकांत पाटील, प्रकाश पाटील, संजय काकडे, मयुर पाटील, सिताराम पारधे, बी. डी. पाअील, चंद्रकांत चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकरी संघटनेचे खान्देश विभागप्रमुख यांनी म्हणाले की, 32 वर्षात सातत्याने शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. आपण या देशाचे नागरिक म्हणून काय करू शकतो? म्हणुन किमान एक दिवस शेतकऱ्यांकरिता उपोषण व अन्नदात्यासाठी पुढे आले पाहिजे. शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो
 

बातम्या आणखी आहेत...