आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहूरच्या विद्यार्थिनीची तणावातून अात्महत्या; अायुर्वेद महाविद्यालयाच्या वसतिगृहातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- तालुक्यातील साकेगाव येथील चैतन्य अायुर्वेद महाविद्यालयात पहिल्या वर्षातील २० वर्षीय विद्यार्थिनीने वसतिगृहातील पंख्याला ओढणी बांधून गळफास घेवून अात्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. पूजा अरुण पाटील (रा.पहूर कसबे, ता.जामनेर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव अाहे. तिने तणावातून हे टाेकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज अाहे. 


पहूर कसबे येथील डॉ.अरुण पाटील यांची मुलगा पूजा ही साकेगावातील चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. तिने मंगळवारी सायंकाळी मुलींच्या वसतिगृहात पहिल्या मजल्यावरील १३ नंबरच्या रूममध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच तालुका पाेलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन खामगड, गजानन काळे, राजेंद्र पवार यांनी महाविद्यालय गाठले. मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना केला. 


दरम्यान, आत्महत्येपूर्वी पूजाने एका नोटबुकमध्ये वडिलांच्या नावाने सहा ते सात पानांची चिठ्ठी लिहिल्याचे समोर आले अाहे. यात तिला गायन आणि नृत्य प्रकारात करिअर करायचे होते. तसे न करता आल्याने ती तणावात होती, असा उल्लेख या चिठ्ठीत आहे. पूजाने यापूर्वी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तसेच चिठ्ठीत पूजाने आत्महत्येसाठी कोणासही जबाबदार धरले नाही. 'आय लव्ह यू पप्पा' असा उल्लेख असल्याचे तपासाधिकारी सचिन खामगड यांनी सांगितले. याप्रकरणी महाविद्यालयाचे लिपिक चंद्रकांत पाटील यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नाेंद झाली. पहूर येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ.अरुण पाटील यांची मुलगी पूजा रविवार आणि सोमवारी गावाकडे होती. ती सोमवारी सायंकाळी वसतिगृहात परत गेली, असे सूत्रांनी सांगितले. तिच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. 

बातम्या आणखी आहेत...