आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनवेल येथे 'नीट'ची तयारी करणाऱ्या 12 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल (जळगाव)-  मनवेल येथे  'नीट'ची तयारी करणाऱ्या एका इयत्ता 12 वीच्या विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्य केली आहे. गुरूवारी (दि. 15) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शुभांगी भगवान पाटील (वय 17) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

 


शुभांगी ही चोपडा (जि.जळगाव) येथील महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता 12 वीचे शिक्षण घेत होती. शेवटच्या पेपरला उशीर असल्याने ती गावी मनवेल (ता.यावल) येथे आली होती. तिला अजुन एक पेपर द्यायचा होता तर गुरूवारी सकाळी ती घरात एकटी होती. बराच वेळ ती बाहेर न आल्याने कुटंबियांनी घरात पाहिले असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला तात्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आलेे. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...