आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • जळगावमध्‍ये धरणात टँकर लावून चालक झोपी, The Driver Slept With A Tanker In The Dam In Jalgao

Jalgaon: धरणात टँकर लावून चालक झोपला, आता शर्थीचे प्रयत्‍न करूनही बाहेर निघेना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- टँकरचालकाला झोप लागल्‍याने टँकरच धरणात रुतल्‍याची विचित्र घटना जिल्‍ह्यातील पारोळा तालुक्‍यात घडली आहे. सुदैवाने चालकाला वेळीच जाग आल्‍याने त्‍याला सुरक्षितरीत्‍या बाहेर काढण्‍यात आले आहे. 


तामसवाडी गावाजवळील बोरी धरण परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली. पारोळा शहराला पाणीपुरवठा करण्‍यासाठी हे टँकर नेहमी बोरी धरणातील विहिरीवर जात असे. रविवारपर्यंत या परिसरात पुरेसा पाऊस न झाल्‍याने धरण कोरडे होते. सकाळी विहिरीवरून लवकर पाणी भरता यावे म्‍हणून टँकरचालक बाबासाहेब सोपान (38) रात्रीच याठिकाणी जात असे व विहिरीजवळ टँकर उभे करून त्‍यात झोपत असे. त्‍यानूसार रविवारी रात्रीही ते पाणी भरण्‍याकरीता गेले होते. मात्र त्‍याच दरम्‍यान धरणाच्‍या वर असलेल्‍या मालेगाव परिसरात जोरदार पाऊस झाल्‍याने बोर नदीला मोठा पूर आला. त्‍यामुळे बोरी धरणात सकाळपर्यंत मोठा जलसाठा जमा झाला होता.

 

मात्र झोपेत असलेल्‍या टँकरचालकाला याची चाहूल लागली नाही. सकाळी त्‍यांना जाग येईपर्यंत टँकर चाकापर्यंत बुडून गेले होते. नंतर गावक-यांच्‍या मदतीने चालक बाबासाहेब राजपूत यांना बाहेर काढण्‍यात आले. मात्र टँकर चाकापर्यंत बुडल्‍याने ते धरणात रुतून बसले. 


शर्थीचे प्रयत्‍न करूनही टँकर निघेना 
टॅंकर मालक हरिभाऊ गंगाधर मोरे यांनी सोमवारी 2 क्रेनद्वारे टॅंकर काढण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र 3 तास शर्थीचे प्रयत्‍न करूनही टँकर बाहेर आले नाही. हे टँकर किना-यापासून 700 फुट अंतरावर अडकले आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, टँकर बाहेर काढण्‍याचे प्रयत्‍न होत असतानाचे फोटोज...  

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...