आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • THREE KILEED IN JALGAON ACCIDENT,जळगावात महामार्गावर १२ तासांत दोन अपघात; मायलेकीसह ३ ठार

जळगावात महामार्गावर १२ तासांत दोन अपघात; मायलेकीसह ३ ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- बेदरकार आणि सुसाट दोन कंटेनरने महामार्गावर अवघ्या १२ तासांमध्ये दोन बळी घेतले. सकाळी सव्वा आठ वाजता एकलग्न गावाजवळ एका कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवर पाठिमागे बसलेल्या माय-लेकी कंटेनरच्या चाकाखाली चिरडल्या गेल्या.तर दुचाकीस्वार पिता गंभीर जखमी झाला. मंगळवारी सकाळी ८.१५ वाजता हा अपघात झाला. दरम्यान,अपघातानंतर तब्बल पाऊण तास पोलिसांनी प्रतिसाद न दिल्यामुळे संतप्त नागरिकांनी महामार्गावर रास्ता रोको केला.त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. हा भीषण अपघात होऊन १२ तास उलटत नाहीत तोच रात्री ८ वाजता बांभोरी गावाजवळ पुन्हा एक अपघात झाला. यात दुचाकीवर निघालेल्या बांभोरी येथील ३५ वर्षीय एसटी बसचालकास कंटेनरने धडक दिली. त्याचा जागीच मृत्यू झाला. अनिल छगन नन्नवरे (रा.बांभोरी) असे मृत एसटी बसचालकाचे नाव आहे. रात्री संतप्त नागरिकांनी कंटेनर फोडला. 


संगीताबाई सुकदेव पाटील (वय ४३), काजल सुकदेव पाटील (वय २३) असे मृत माय-लेकींचे नाव आहे. तर सुकदेव ओंकार पाटील (वय ५०, रा. एकनाथनगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे जखमी पित्याचे नाव आहे. त्यांचे मूळ गाव पाचाेरा तालुक्यातील वडगाव (सतीचे) अाहे. गेल्या २५ वर्षांपासून ते जळगावात राहण्यासाठी आले आहेत. सुकदेव पाटील हे जळगावात सुरक्षारक्षक म्हणून खासगी नोकरी करतात. दरम्यान, सोमवारी तिघे जण दुचाकीने (एमएच १९ बीडी ७८८७) पाराेळा तालुक्यातील कामतवाडी येथील पाटील यांचे साडू संजय हिलाल पाटील यांच्या घरी गेले होते. मंगळवारी सकाळी ७ वाजता ते परतीच्या प्रवासाला निघाले. सकाळी ८.१५ वाजता एकलग्न गावाजवळ पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात पाटील हे दुचाकीसह रस्त्याच्या कडेला फेकले गेले. तर त्यांच्या पत्नी संगीताबाई व मुलगी काजल ह्या रस्त्यावर फेकल्या गेल्या. त्यामुळे संगीताबाई व काजल यांच्या डोक्यावरून कंटेनरची चाके गेल्याने त्यांचे चेहरे छिन्न-विछिन्न झाले होते. तर पाटील यांचे डाेके व कमरेवर मार लागला. घटनास्थळावर ते शुद्धीवर होते. त्यांनी चुलत भाऊ सुरेश पाटील यांचा मोबाइल क्रमांक एका व्यक्तीस दिला. त्यानुसार ही घटना सुरेश पाटील यांना कळवण्यात अाली. सुरेश पाटील यांनी तत्काळ जळगावातून मदतकार्य सुरू केले. यांनतर मृत संगीताबाई व काजल यांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. पाटील यांना खासगी वाहनातून आधी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले होते. नंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


पाऊण तास मदतकार्य नाही, नागरिकांचा रास्ता रोको
अपघातानंतर एकलग्न येथील शेकडो नागरिक घटनास्थळी जमले होते. सर्वांनी मिळून महामार्ग व एरंडोल पोलिसांना संपर्क केला. परंतु, सुमारे पाऊण तासापर्यत पोलिसांची मदत मिळाली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी काहीवेळ महामार्गावर 'रास्ता राेको 'केला. यामुळे दोन्ही दिशेने वाहतुकीची कोंडी झाली होती. अखेर घटना जळगावात कळाल्यानंतर खऱ्या अर्थाने मदतकार्यास सुरुवात झाली. तर रात्री आठ वाजता झालेल्या अपघातानंतरही नागरिकांनी कंटेनर फोडून आपला संताप व्यक्त केला. दरम्यान,अपघातानंतर कंटेनरचालक थांबला नाही. तो वाहनासह निघून गेला. एकलग्न येथील काही नागरिकांनी हा अपघात पाहिला अाहे. परंतु, कंटेनर भरधाव असल्यामुळे त्यास थांबवणे शक्य झाले नाही. तर रात्री बांंभोरीजवळ झालेल्या अपघातानंतर कंटेनरचालकास नागरिकांनी पकडले. 

बातम्या आणखी आहेत...