आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरू शिष्‍याच्‍या नात्‍याला काळीमा; चौदा वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- खासगी क्लासमध्ये शिकवणीसाठी येणाऱ्या १४ वर्षीय शाळकरी मुलीचे अश्लील फोटो काढून बदनामी करण्याची धमकी देत शिक्षकानेच तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिक्षकाला  आहे.  


तुषार शांताराम माळी (२९, नशिराबाद) हा नशिराबादच्या एका शाळेत विनाअनुदानित तत्त्वावर शिक्षक पदावर नोकरीस होता. ६ महिन्यांपूर्वी काही कारणास्तव त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. त्याशाळेत पीडित विद्यार्थिनी सीमा (नाव बदललेले)आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. दरम्यान, शिक्षक माळीने घरीच खासगी क्लासेस सुरू केले. सीमा ही देखील त्याच्या क्लासमध्ये दाेन विषयांच्या शिकवणीला जात असे. ‘तुला नापास करून टाकेल,’ अशी धमकी तुषारने नोव्हेंबर २०१७मध्ये सीमाला दिली. तसेच याच धमकीच्या आधारे त्याने घरातच सीमावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. यातच ती गर्भवती झाली. काही दिवसांपूर्वी तिचे पोट दुखू लागल्यामळे कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले. असता ती १२ आठवड्यांची गर्भवती असल्याचे उघडकीस आले.  कुटुंबीयांच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...