आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा प्रगतीसाठी केंद्रप्रमुखांना शैक्षणिक नेतृत्वाचे प्रशिक्षण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शाळा प्रगत करण्यासाठी केंद्रप्रमुखांना आता शैक्षणिक नेतृत्वाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. १०० टक्के शाळा प्रगत करण्याचे उद्दिष्ट केंद्र प्रमुखंाना देण्यात आले आहे. या उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगाने यंदाच्या शैक्षणिक सत्रात शिक्षण विभागाकडून लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. 


प्राथमिक शैक्षणिक क्षेत्रात काही वर्षात नवनवीन प्रयोग राबविले जात आहेत. महाराष्ट्र प्रगत शैक्षणिक कार्यक्रमातुन विविध प्रयोग राबवत विद्यार्थांना शैक्षणिक दृष्ट्या प्रगत करण्याचे प्रयत्न या माध्यमातून केले जात आहे. प्रत्येक विद्यार्थांची शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून शिक्षण विभागाकडून त्यापुढे देखील विविध प्रयोग राबविले जाणार आहे. सर्वच विषयात ७५ टक्के गुण घेण्याची अध्यनस्तर निश्चिती केली जाणार आहे. १०० टक्के शाळा प्रगत करण्यासाठी राज्यातील सर्व केंद्रप्रमुख एमओटी, एसएलडीपी या शाळा सिद्धी प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणाची रचना करताना विहित तज्ज्ञ असलेल्या व्यक्तिचा एक मास्टर फॅसिलेटर तज्ज्ञ सुलभक म्हणून एक राज्यस्तर गटात पाच कार्यशाळा पूर्ण करुन मास्टर फॅसिलेटर तयार करण्यात आला आहे. 


या गटामार्फत सर्व केंद्रप्रमुखांना मदत, सल्ला तसेच समुपदेशन देणारा प्रशिक्षण गटासाठी ज्ञान, कौशल्य, अभिवृत्ती, व दृष्टीकोन निर्माण करणारे प्रशिक्षण, क्षेत्र कार्य, मदत त्याचप्रमाणे सल्ला देणे अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्यक्ष केंद्रप्रमुख सक्षमीकरणासाठी सन २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षात पूर्ण करावयाचे असल्याने केंद्र प्रमुखांची माहिती मागविण्यात आली असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. याबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालिका डॉ. नेहा बेलसरे यांच्याकडून शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या अाहेत. 


हे आहेत शाळा ठरवण्याचे निकष 
प्रगत शाळा घोषित करण्यासाठी २५ निकष करण्यात आले असून प्रत्येक निकष पूर्ण असेल तरच १०० टक्के गुण मिळतील आणि तीच शाळा प्रगत समजली जाणार आहे. पट आणि वर्षभराची सरासरी उपस्थिती शाळाबाह्य बालके आणि प्रत्यक्ष प्रवेशीत बालके, शाळा परिसर आदी स्पष्ट असावा. प्रत्येक विषयासाठी ज्ञानरचनावादी साहित्य किमान १० घटकावर आधारित २० प्रकारचे साहित्य शिक्षकांना स्वनिर्मित केलेले असावेत. कोणत्याही विद्यार्थांस किमान ५ गणिती संख्या वाचता लिहिता येणे, किमान एक बेरीज एक वजाबाकी, व एक गुणाकार करता येणे. प्रत्येक विद्यार्थास त्या इयत्तानुरुप किमान ५ वाक्ये वाचता व वृत्तलेखनाने लिहता येणे, कोणतीही कविता सादर करता येणे, वर्गानुकुल ३ शब्द दिल्यास किमान ५ वाक्ये तयार करता येणे, ५ इंग्रजी प्रश्नांची उत्तरे देता येणे, दिलेल्या विषयावर मत मांडणे आदी निकषांचा समावेश आहे. 

बातम्या आणखी आहेत...