आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळीसगाव तालुक्यात दोघांचा गळफासने मृत्यू ,

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव- तालुक्यातील पिंप्री बु. प्र.दे. येथे २५ वर्षीय तरूणाने वनविभागाच्या हद्दीत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसरी घटना तालुक्यातील पिंपळगाव म्हाळसा येथे घडली. तेथे ६० वर्षीय इसमाने शेतातील कांदा चाळीत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. 
योगेश साहेबराव पाटील व मधुकर शंकर माळी असे दोघं मृतांची नावे आहेत. पिंप्री बु. प्र.दे. खुर्द येथील योगेश साहेबराव पाटील (वय २५) या तरुणाने जंगलात झाडाला दोरखंड बांधून आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मेहुणबारे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 


अाजाराला कंटाळून गळफास 
पिंपळगाव म्हाळसा येथील शेतकऱ्याने आजाराला कंटाळून स्वत:च्या शेतातील कांदा चाळीत गळफास घेऊन आली. जीवनयात्रा संपविली. शुक्रवारी सकाळी ही उघडकीस आली. मधुकर शंकर माळी अनेक दिवसांपासून अाजाराने त्रस्त असल्याचे कळते. त्यांनी शेतातील कांदा चाळीत लाेखंडी अँगलला दाेर बांधून गळफास घेतला. या प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...