आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिसभेसाठी अाज 26 केंद्रांवर मतदान; बुधवारी मतमाेजणी; 32 उमेदवार रिंगणात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर (सिनेट) नोंदणीकृत पदवीधरांमधून निवडून द्यावयाच्या १० जागांसाठी रविवारी मतदान हाेणार अाहे. निवडणुकीत ३२ उमेदवार रिंगणात अाहे. २४ जानेवारी रोजी विद्यापीठ परिसरात मतमोजणीला हाेणारअाहे. 


मतदानासाठी जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यात २६ केंद्रांमध्ये ६६ बूथवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. २३ हजार ७३७ मतदार सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी ४०० पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आली आहेत. नऊ विभागीय अधिकाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भ.भा.पाटील यांनी दिली. 


यंदा चुरस वाढली 
नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यापासून सिनेटची ही पहिलीच निवडणूक आहे. विद्यापीठ विकास आघाडीविरुद्ध विद्यापीठ विकास मंच असे पूर्वीचे प्रतिस्पर्धी आहेत. यंदा विद्यापीठ परिवर्तन मंचची त्यात भर पडली आहे. चार अपक्ष उमेदवार देखील रिंगणात आहेत.त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे.