आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाचोरा- भडगाव येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या २६ वर्षीय महिला पोलिसाने पाचोरा येथील रेल्वेस्थानकावर गोवा एक्स्प्रेसखाली उडी घेऊन मंगळवारी आत्महत्या केली. पतीशी झालेल्या किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी रेल्वे पोलिसांना सांगितले. संगीता शिवाजी निकम असे मृत पोलिसाचे नाव आहे.
संगीता या मंगळवारी पोलिस ठाण्यात ड्यूटीवर हजर झाल्या. त्यानंतर काही वेळातच त्यांचे पती दीपक पाटील यांच्यासह त्या दुचाकीने पाचोरा येथील रेल्वेस्थानकावर आल्या. याच वेळी भुसावळकडून मुंबईकडे वेगाने जात असलेल्या रेल्वेखाली संगीता यांनी उडी घेतली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. निकम यांच्या शरीराचे इतके बारीक तुकडे झाले होते की ते पोलिसांना उचलणे कठीण झाले होते. संगीता यांचे लग्न दोन वर्षांपूर्वी झाले होते. त्यांचे पती परधाडे रेल्वेस्थानकावर ट्रकमन म्हणून सेवेत होते. दीपक आपल्या आई-वडिलांना नेहमी पैसे द्यायचे. यावरून दोघांत अनेकदा भांडणे झाली होती. मंगळवारीही त्यांच्यात रेल्वेस्थानकात याच मुद्द्यावरून वाद झाला होता. त्यामुळे संगीता यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.