आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अाय क्विट’ स्टेटस टाकून तरुणाची आत्महत्या; पोलिसांनी आयफोन पाठवला कंपनीकडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- हरातील तापी नगरमध्ये राहणा ऱ्या तरुणाने  या राहत्या घरात गळफास घेऊन अात्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजता घडली. चेतन गाेपाळप्रसाद मालवीय (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येपूर्वी चेतनने त्याच्या अायफाेनमध्ये व्हॅट्सअॅपवर ‘अाय क्विट’ असे स्टेट्स टाकले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद झाली. 

 

तापी नगरमधील रहिवासी चेतन मालवीय याने राहत्या घरात बेडरूममधील सीलिंग फॅनला दाेरी बांधून गळफास घेतला. हा प्रकार घडला तेव्हा चेतनची आई आणि बहिण कामानिमित्त बाहेर गेले होते. त्या दोघी घरी परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला. चेतनचे वडील रेल्वेत नोकरीला आहेत. सुमित किशोर परदेशी यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नाेंद झाली. सहायक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले यांनी घटनास्थळी चेतनचा माेबाइल जप्त केला. फिंगर लॉक असलेला हा मोबाइल कंपनीकडे पाठवण्यात येईल. त्यात या घटनेचे कारण शोधण्याच्या दृष्टीने काही माहिती मिळते का? याचा पोलिस तपास करणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...