आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधुळे- जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाने जिल्ह्यातील एक लाख ३६ हजार ७७८ बालकांची तपासणी केली. या तपासणीत ५०५ बालके कुपोषित आढळली. या कुपोषित बालकांच्या भरण-पोषणासाठी त्यांना दि. जानेवारीपासून ग्रामीण बालविकास केंद्रामध्ये समाविष्ट केले जाईल. या केंद्रामध्ये बालकांच्या पोषणासह सुदृढ आरोग्यावर भर देण्यात येईल. कुपोषित बालकांमध्ये आदिवासी तालुक्यांच्या तुलनेत धुळे तालुक्यातील बालकांची संख्या अधिक आहे.
अंगणवाडी सेविकांतर्फे जिल्ह्यात शून्य ते सहा वर्षे वयोगटाच्या एक लाख ३६ हजार ७७६ बालकांचे वजन घेण्यात आले. बालकांचे वजन घेतल्यानंतर त्यांची उंची दंडाचा घेर मोजण्यात येताे. त्यात ५०५ बालकांमध्ये कुपोषण आढळले. वजनाच्या तुलनेत या बालकांचा उंची आणि दंडाचा घेर कमी असल्याचे आढळून आले. यानुसार या बालकांना अतितीव्र कमी वजन असलेल्या गटात टाकण्यात आले आहे.
तीन गटात बालकांची वजन, उंची, दंड घेराची तपासणी केली. त्यात ते वयोगटात २६ हजार ५१२ बालकांची तपासणी केली. त्यात ३९ बालके कुपोषित आहेत. तर ते वर्षे वयोगटातील ५२ हजार ३५२ बालकांपैकी २०७ बालके कुपोषित आहेत. तर ते वयोगटातील ५७ हजार ९१४ बालकांपैकी २५९ बालके कुपोषणग्रस्त आहेत. सॅम बालकांना एक महिन्यापर्यंत ग्रामीण बालविकास केंद्रात दाखल करण्यात येणार आहे. या ठिकाणी त्या बालकांचे वजन आणि उंची वाढीच्या दृष्टीने आहाराचे नियोजन केले जाईल.
मोठ्या प्रमाणात कुपोषित बालके आढळल्यामुळे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. साक्री आणि शिरपूर हे दोन आदिवासीबहुल तालुके आहेत. मात्र आदिवासीबहुल तालुक्यांच्या तुलनेत धुळे सारख्या तालुक्यातच कुपोषणाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. धुळे तालुक्यात तब्बल २४८ बालकांचे वयाच्या तुलनेत उंची आणि दंड घेर कमी आढळून आला आहे. तर आरोग्य सुदृढ बालकांची संख्या सतत अवर्षणग्रस्त असलेल्या शिंदखेडा तालुक्यात अधिक आहे. शिंदखेडा तालुक्यातून २० हजार २२९ बालकांची तपासणी करण्यात आली.
असे आहेत बालविकास केंद्र
जिल्ह्यात२२९ बालविकास केंद्र असून, या बालविकास केंद्रांसाठी जानेवारीनंतर पोषण आहार आणि निधीची उपलब्धता होणार आहे. धुळे तालुक्यात ९०, शिंदखेडा तालुक्यात १५, शिरपूर तालुक्यात ८१ तर साक्री तालुक्यात ४३ बालविकास केंद्रांचा समावेश आहे.
पोषण आहारासंदर्भात झाले प्रशिक्षण
जिल्ह्यातील४१ प्राथमिक आरोग्य केंद्रातील तसेच महिला बालविकास केंद्रातील कर्मचाऱ्यांना कुपोषित बालकांच्या पोषण आहारासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या २७७ तर महिला बालविकास विभागांतर्गत एक हजार ९५५ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.