आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्मार्ट जळगाव’ अॅपवरील 668 तक्रारींचा निपटारा शून्य; मनपाकडे सात महिन्यांत 2033 तक्रारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- नागरिकांना तक्रारींसाठी महापालिकेच्या चकरा माराव्या लागून नये म्हणून लाखाे रुपये खर्च करून कार्यान्वित केलेल्या ‘स्मार्ट जळगाव’ अॅप काॅल सेंटरचा फारसा उपयाेग हाेत नसल्याची बाेंब अाहे. गेल्या सात महिन्यांत २०३३ तक्रारी प्राप्त झाल्यानंतरही अद्याप तब्बल ६६८ तक्रारींचा निपटाराच हाेऊ शकलेला नाही. नागरिक तक्रारी करतात; परंतु त्याची दखल घेतली जात नसल्याने या खर्चीक यंत्रणेचा काय उपयाेग, असा संतप्त प्रश्न उपस्थित होत अाहे. 


सात महिन्यांपूर्वी महापालिकेने नागरिकांना अापल्या भागातील तक्रारी देण्यासाठी वारंवार पालिकेत चकरा मारण्याची गरज भासू नये यासाठी ‘जळगाव स्मार्ट’ हे अॅप तसेच काॅल सेंटर सुरू केले हाेते. सुरुवातीला नागरिकांनी या अॅपचा पुरेसा वापर केला नाही. परंतु अाता शहरातील सुमारे हजार नागरिकांनी अॅप डाऊनलाेड केले अाहे. सात महिन्यांत अातापर्यंत अॅप कॉल सेंटरच्या माध्यमातून २०३३ तक्रारी दाखल झाल्या अाहेत. 


तक्रारी साेडवण्याकडे दुर्लक्ष 
अॅपच्यामाध्यमातून टेक्नाे सॅव्ही नागरिक अापल्या भागातील तक्रारी अपलाेड करतात; परंतु त्या तक्रारींची दखल संबंधित विभागाकडून घेतली जात नसल्याची अाेरड अाहे. साफसफाई, पथदिवे बंद असणे यासारख्या किरकाेळ तक्रारींसाठीही १५ दिवस ते महिनाभराचा कालावधी लागत अाहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार तक्रारी कराव्या लागत अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...