आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधुळे- शहरात शाळा‑महाविद्यालयांमध्ये डिसेंबरअखेर गॅदरिंगचे वातावरण आहे. शुक्रवारी तब्बल तीन महाविद्यालयांमध्ये झालेल्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी कलागुणांची उधळण करीत जल्लोष केला. कमलाबाई कन्या शाळेत चक्क फॅशन शो झाला. यामध्ये रंगीबेरंगी वस्त्रप्रावरणात रॅम्पवर अवतरलेल्या स्वप्नसंुदरींनी गॅदरिंगच्या वातावरणात रंगत भरली. त्यामुळे एकच जल्लोष वाढला. जिजामाता हायस्कूल, जयहिंद महाविद्यालयातही दिवसभर गॅदरिंगमुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गजबज दिसून आली. प्राध्यापकांचेही यासाठी लगबग दिसून आली.
फॅशन डिझायनिंग विभागातील विद्यार्थिनींचा फॅशन शो आकर्षण
येथील स्त्री शिक्षण संस्थेच्या कमलाबाई कन्या शाळा घासकडबी कनिष्ठ महाविद्यालयात शुक्रवारी स्नेहसंमेलन झाले. त्यात इंटिरियर डिप्लोमा अभ्याक्रमाच्या विद्यार्थिनींनी विविध वस्तूंचे प्रदर्शन भरवले. तसेच डिप्लोमा इन गारमेंट अॅण्ड फॅशन डिझायनिंग विभागातील विद्यार्थिनींनी फॅशन शो सादर केला.
महाविद्यालयात सकाळपासूनच विविध गुण दर्शनाच्या कार्यक्रमांना प्रारंभ झाला. डिप्लोमा इन इंटिरियर विभागातील विद्यार्थिनींनी मूकनाट्य सादर करत सामाजिक विषयांवर प्रकाशझोत टाकला. प्राथमिक विद्या मंदिराच्या विद्यार्थिनींनी भारुड सादर केले. डिप्लोमा इन गारमेंट अॅण्ड फॅशन डिझायनिंग विभागाचा फॅशन शो झाला. या शोमध्ये विविध तरुणींनी वेषभूषा करून सहभाग नोंदवला.
हा फॅशन शो भारतीय संस्कृतीवर आधारित होता. त्यामुळे तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. इंटिरियर डिझायनिंग विभागाच्या विद्यार्थिनींनी इनडोअर फाउंडेशन अॅण्ड आऊट बॉक्स आयडियाज या विषयावर विविध वस्तूंचे प्रदर्शन भरवले. प्रदर्शनात विद्यार्थिनींनी तयार केलेल्या अनेक वस्तू मांडण्यात आल्या होत्या. मुख्याध्यापिका सीमा दीक्षित, सुनीता सूर्यवंशी, मनीषा जोशी यांनी संयोजन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.