आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अामदार डाॅ. सतीश पाटलांनी केलेले नदीजाेड प्रकल्पातील काम प्रेरणादायी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- अामदार डाॅ. सतीश पाटील यांचे नदीजाेड प्रकल्पातील काम प्रेरणादायी अाहे. राजकीय कारकिर्दीमध्ये यशाने हुरळून जाता अाणि अपयशाने खचून जाता त्यांनी काम केले अाहे. अाज जमलेला समुदाय हा त्यांच्या कामाची पावती असल्याचा उल्लेख माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. 


नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा अामदार डाॅ. सतीश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वपक्षीय गाैरव साेहळ्याचे अायाेजन करण्यात अाले हाेते. या वेळी व्यासपीठावर अजित पवार, माजी मंत्री एकनाथ खडसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, अामदार डाॅ. सतीश पाटील, अामदार किशाेर पाटील, अामदार प्रा. चंद्रकांत साेनवणे, अामदार डाॅ. सुधीर तांबे, माजी विधानसभा अध्यक्ष अरूण गुजराथी, माजी खासदार ईश्वरलाल जैन, अॅड. वसंतराव माेरे, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, डाॅ. सतीश पाटील यांच्या पत्नी रेखा पाटील, माजी अामदार गुलाबराव देवकर, राजीव देशमुख, शिरीष चाैधरी, ईश्वर जाधव, डाॅ. गुरूमुख जगवाणी, दिलीप वाघ, दिलीप साेनवणे, संताेष चाैधरी, अरुण पाटील, गफ्फार मलिक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते. प्रास्ताविक गाैरव समितीचे अध्यक्ष तथा पणन महासंघाचे संचालक संजय पवार यांनी केले. 


अजित पवारांना मुख्यमंत्रीपद अाणि खडसेंना मंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा संजय पवार यांनी व्यक्त केली. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी डाॅ. सतीश पाटील हे राष्ट्रवादीचे कणखर नेतृत्व असल्याचा उल्लेख केला. डाॅक्टरांचे नदीजाेडचे काम वाखाणण्याजोगे अाहे. अाजच्या राजकारण्याच्या व्याख्येत डॉक्टर परफेक्ट असल्याचा उल्लेख गुजराथी यांनी केला. माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी अामदार डाॅ. सतीश पाटील यांच्या कार्याचा गाैरव केला. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी अामदार डाॅ. पाटील हे दिलदार मित्र असल्याचा उल्लेख केला. या वेळी अामदार डाॅ. सतीश पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीवर एक चित्रफित दाखवण्यात अाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डाॅ. पाटील त्यांच्या पत्नी रेखा पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात अाला. कार्यक्रमाला अामदार डाॅ. सतीश पाटील यांच्या मातोश्री मनकर्णीका पाटील उपस्थित हाेत्या. 


खडसेंच्या नेतृत्वातील कामाची तयारी 
गाैरवालाउत्तर देतांना डाॅ. सतीश पाटील यांनी भावनिक हाेऊन अाठवणींना उजाळा दिला. सन १९९५मध्ये स्व. गाेपीनाथ मुंडे, अामदार एकनाथ खडसे पाराेळ्यात माझ्या भाजप प्रवेशासाठी मुक्कामाला अाले हाेते. सर्व तयारी झाली हाेती; परंतु अपक्ष अामदार असलेल्या वडिलांनी मला सपत्नीक महाबळेश्वरला पळवून लावले हाेते. त्यानंतरचा राजकीय प्रवास शरद पवारांच्या नेतृत्वात सुरू झाला. अामदार खडसेंचा राजकीय संघर्ष अाणि विकासाचे व्हिजन अाम्ही पाहिले अाहे. त्यांच्यावर भाजपमध्ये अन्याय हाेत अाहे. त्यांच्या मनात काही असेल तर अाम्ही त्यांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार असल्याचा विषय अामदार डाॅ. सतीश पाटील यांनी छेडला. दरम्यान, जलसंपदाचे काम बिघडले अाहे. हे खाते खडसेंकडे असते तर अाज गिरणेचे पाणी मिळाले असते, असेही अामदार डाॅ. पाटील म्हणाले. तसेच त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाचे टप्पे सांगितले. 


राजकारणात कायमचे शत्रुत्व निभावू नका 
राजकारणातकुणीच कुणाचा कायमचा मित्र अथवा कायमचा शत्रू नसताे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला राजकीय सुसंस्कृतपणा दिला अाहे. राजकारणात नेहमी समीकरणे बदलत असतात. अामदार खडसे अाणि मी एका व्यासपीठावर यापूर्वीही अालाे अाहाेत, मात्र माध्यमांनी नजर बदलली असल्याची टिपणी अजित पवार यांनी केली. लाल दिवा जन्मभरासाठी मिळत नाही, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवून काम केले पाहिजे. कर्जमाफी, कापसावरील बोंडअळी अाणि किमान आधारभूत किमतीच्या विषयावर सरकारला निर्णय घेता येत नसल्याची टिका पवार यांनी केली. अामदार डाॅ. सतीश पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीतील उतार-चढाव अाणि कार्याचा उल्लेख अजित पवार यांनी या वेळी केला. 


धरणांना मंजुरी ही घोडचूक 
१००टीएमसीची क्षमता असलेले गिरणा धरण हे जळगाव जिल्ह्यासाठी महत्वाचे अाहे. यापूर्वी ते दरवर्षी १०० टक्के भरत हाेते. परंतु अामचे सरकार असताना अाम्ही गिरणा प्रकल्पाच्यावर कॅचमेंट एरियात काही धरणांना मंजुरी दिल्याची घोडचूक झाली अाहे. त्या धरणांना मंजुरी दिली नसती, तर अाज गिरणा दरवर्षी पूर्ण भरू शकले असते, असे अामदार खडसे म्हणाले. दरम्यान, अाता नार-पार याेजनेचे पाणी गुजरात एेवजी खान्देशला मिळावे म्हणून सर्वपक्षीय एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचे ते म्हणाले. अजित पवार यांच्याशी वैयक्तीक जिव्हाळ्याचे संबंध अाहेत. त्यांच्या मदतीमुळेच अाज वरणगाव उपसा सिंचन याेजना सुरू हाेण्याच्या अवस्थेत अाहे. राजकीय स्पर्धा ही निकाेप असली पाहिजे. अायुष्यात मंत्रिपदासाठी काम केले नाही. अनेक कार्यकर्ते माेठे केले, त्यातील काही कृतज्ञ तर काही कृतघ्न निघाल्याचा उल्लेख खडसेंनी केला. 

बातम्या आणखी आहेत...