आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
वाघूर पाणीपुरवठा योजनेंतर्गत टाकण्यात अालेल्या १२०० मिलीमीटर जलवाहिनीला जलतरण तलावासमोर शिवाजी उद्यानातील स्मशानभूमी आवारात गळती लागली हाेती. या गळतीच्या दुरूस्तीचे काम महापालिकेने गुरुवारी हाती घेतल्याने पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात अाला हाेता. त्यामुळे शुक्रवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात अाला. दरम्यान, २५ तासांपासून सुरू असलेले दुरूस्तीचे काम शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता पूर्ण झाले. त्यानंतर जलकुंभ भरण्यात अाले. त्यामुळे शुक्रवारी ज्या भागात पाणीपुरवठा हाेऊ शकला नाही, त्या भागात शनिवारी करण्यात येणार असल्याचे अभियंता डी. एस. खडके यांनी सांगितले.
या भागात हाेईल पाणीपुरवठा
वाल्मीक नगर,कांचननगर, दिनकर नगर, अासाेदा राेड परिसर, मेहरूण परिसर, अयोध्यानगर परिसरातील शांतिनिकेतन, गृहकुल काॅलनी, म्हाडा काॅलनी, अजिंठा साेसायटी, मोहननगर, नेहरूनगर, हरिविठ्ठल नगर, पिंप्राळा, दांडेकरनगर, मानराज पार्क, असावानगर, निसर्ग काॅलनी, द्रौपदीनगर, मुक्ताईनगर, खाेटेनगर, शिवाजीनगर हुडकाे, एसएमअायटी परिसर, तांबापुरा, योगेश्वरनगर, खेडी गाव परिसर, वाघनगर, हरिविठ्ठलनगर, शिव काॅलनी, विद्युत काॅलनी, राका पार्क, पाेस्टल काॅलनी आदी.
शिवाजी उद्यान परिसरातील जलवाहिनीला लागलेली गळती दुरुस्ती करताना मनपाचे कर्मचारी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.