आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2261 महिलांची फसवणूक करणाऱ्या युवकास अटक, महिलांना गृहोद्योग व रोजगार देण्याचे आमिष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ओपीएम महिला गृहोद्योगाच्या नावाखाली जळगाव, भुसावळ जामनेर तालुक्यामधील हजार २६१ महिलांना रोजगार मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची २२ लाख ६१ हजार रूपयात लुबाडणूक करणाऱ्या मनोज आधार नाथबाबा (वय ३३, रा. खंडेरावनगर) याच्याविरोधात शुक्रवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी मनाेज नाथबाबा याला पोलिसांनी अटक केली आहे.

 

सुनीता सुनील महाजन या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून मनाेज नाथबाबा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नाथबाबा याने जून २०१७ रोजी ओपीएम महिला उद्योगामध्ये महिलांना रोजगार देण्यासाठी एका गटातून एक सीअारपी महिला नेमली. त्यासाठी त्यांना प्रत्येक महिन्याला हजार रूपये पगार देण्याचे अाश्वासन दिले हाेते. सुनीता महाजन यांच्यासह २३ महिलांची सीआरपी म्हणून त्याने नेमणूक केली हाेती. या महिलांमार्फत त्यांनी केलेल्या प्रत्येक महिला सभासदांकडून हजार रूपये फी घेतलेली आहे. ही फी घेताना पावतीही देण्यात आलेली आहे. सीआरपींनी सभासदांकडून मिळालेली रक्कम नाथबाबा याच्याकडे जमा केलेली होती. त्यानंतर त्याने मसाले, रांगाेळी, मुलतानी माती पुरवून ते पॅकिंग करण्यासाठी महिलांना २० रूपये प्रती किलो मजुरी देखील दिली हाेती. परंतु डिसेंबर रोजी त्याने सीआरपी सभासदांना पगार देणे बंद केले. तसेच पॅकिंगसाठी कच्चा माल देणेही बंद केले.


त्यामुळे सीआरपींनी सभासदांकडून घेतलेली फी परत मागितली असता त्याने टाळाटाळ करून त्यांची फसवणूक केली. महाजन यांनी मसाला उद्योगाच्या माध्यमातून रोजगार पगार देऊ, असे म्हणून ११२ महिला सभासदांचे लाख २० हजार रूपये त्याच्याकडे दिले होते. त्यांच्यासह २३ सीआरपीमार्फत हजार २६१ सभासदांचे हजार रूपये याप्रमाणे २२ लाख ६१ हजार रूपये सभासद फी घेऊन रोजगार देता फसवणूक करणाऱ्या नाथबाबाच्या विरोधात जळगाव, भुसावळ जामनेर तालुक्यातील फसवणूक झालेल्या महिला एकवटल्या. शुक्रवारी या महिलांनी थेट एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले. मात्र, फिर्याद देण्यासाठी कुणीही महिला समोर येईना. शेवटी पोलिसांनी फसवणूक झालेल्या महिलांनी फिर्याद दिल्यास सीआरपींसह फसवणूक करणाऱ्या नाथबाबावर गुन्हा दाखल होईल, असे सांगितले. त्यानंतर त्या महिलांमध्येच हमरी-तुमरी झाली.

 

महिलेने फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल
सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान पाटील यांनी महिलांसोबत चर्चा केली. भितीपोटी कुणीही फिर्याद द्यायला तयार नव्हत्या. या वेळी शिवसेनेचे शहरप्रमुख शरद तायडे, किशोर भोसले, गणेश सोनवणे तेथे पाेहोचले. सीआरपी महिलांना सभासद महिलांचे पती धमक्या देत असल्याचे त्या महिलांनी सांगितले. शेवटी सुनीता महाजन यांनी फिर्याद दिली.

बातम्या आणखी आहेत...