आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय महाविद्यालयासाठी 109 पदांची निर्मिती; 100 प्रवेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव येथे मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयासाठी १०९ पदांची निर्मिती करण्यात अाली अाहे. ही पदे येत्या एक ते दीड महिन्यात भरण्यात येतील. येत्या शैक्षणिक वर्षात (२०१८) एमबीबीएस अभ्यासक्रमास १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे पहिले अधिष्ठाता डाॅ. भास्करराव खैरे यांनी दिली. त्यांनी गुरुवारी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयास भेट दिली. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एन. एस. चव्हाण उपस्थित हाेते. डाॅ.खैरे यांनी या वेळी संपादकीय सहकाऱ्यांशी दिलखुलास संवाद साधला. 


वैद्यकीय महाविद्यालयाच्या अागामी जडण-घडणीबाबत माहिती देताना डाॅ. खैरे यांनी सांगितले की, शासनाने ११ मे २०१७ ला अादेश काढून जळगावला वैद्यकीय महाविद्यालय उभारणीला मंजुरी दिली. त्या पाठाेपाठ २२ सप्टेंबरला काॅलेजसाठी १०९ पदे मंजूर केली अाहे. सद्य:स्थितीत वर्षांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय हे मेडिकल काॅलेजकडे करार तत्त्वांवर हस्तांतरीत करण्यात अाले अाहे. सिव्हिलमध्ये सद्य:स्थितीत ४५६ बेडची सुविधा अाहे. वैद्यकीय महाविद्यालयसाठी ५०० बेडची अट पुढील टप्प्यात पूर्ण करण्यात येईल. या तीन वर्षांच्या वाटचालीत पहिल्या वर्षात मंजूर पदे १०० टक्के भरणे. 


प्रथम वर्ष एमबीबीएसच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करणे, यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात येईल. त्या दृष्टीने काॅलेजच्या उभारणीसाठी प्राथमिकता म्हणून सिव्हिलमध्ये अाहे त्या सुविधा इन्फास्ट्रक्चरचा वापर करण्यात येणार अाहे. यात जुने सीएस कार्यालयाचा वापर प्रशासकीय कार्यालयासाठी करण्यात येणार अाहे. वर्ग-३ च्या शासकीय निवासस्थानाची डागडुजी करून तेथे विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल तयार करण्यात येणार अाहे. सुरुवातीला नर्सिंग ट्रेनिंग सेंटरच्या जागेचा वापर हा एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना लेक्चर हाॅल म्हणून करण्यात येईल. या अभ्यासक्रमासाठी आवश्यक त्या यत्र सामग्रीलाही मंजुरी प्राप्त झाली अाहे. ती खरेदी करणे सुरू अाहे. येत्या महिन्याभरात ती प्राप्त हाेईल. 


अाराेग्य सुविधेत वाढ

जिल्हा सामान्य रुग्णालयाद्वारे पुरवण्यात येणाऱ्या अाराेग्य सुविधांना मर्यादा असतात; पण वैद्यकीय महाविद्यालयामुळे कायमस्वरुपी निवासी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध राहणार असल्याने नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील. तसेच वैद्यकीय महाविद्यालय स्वत:च्या जागेत गेल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय पुन्हा कार्यरत हाेईल. त्या वेळी जिल्ह्यातील शासकीय अाराेग्य सुविधा दुप्पट हाेतील, याचा सर्वसामान्यांना माेठा फायदा हाेईल. 


फॅकल्टीसाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न 
सद्य:स्थितीतसिव्हिलमध्ये ४२ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर अाहेत. यातील केवळ १४ डाॅक्टर्स प्रत्यक्षात उपलब्ध अाहेत. त्याचप्रमाणे गेल्या १० वर्षांतील तांत्रिक अडचणीमुळे वैद्यकीय महाविद्यालयांना प्राध्यापक मिळणे कठीण झाले अाहे. त्यामुळेच अापणही जाहिरात दिली. परंतु त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अाराेग्य सचिवांकडून ही पद भरण्यासाठी प्रयत्न सुरू अाहेत. ती महिन्याभरात भरली जातील. 


सिव्हिलमधील १२ पैकी एकर जागेवर सुमारे २५० बेकायदा अतिक्रमण हाेते. ते हटवून जागा खाली केली अाहे. यातील ७० वर्ष जुन्या वसाहतीचे स्ट्रक्चरल अाॅडिट करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले अाहे. त्याचा अहवाल अाल्यानंतर ती पाडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच अाहे त्या जागेवर महिला बाल रुग्णालय उभारले जाणार अाहे. उर्वरित जागेवर ५० खाटांच्या अतिदक्षता विभागाची उभारणी होईल. तसेच कर्मचाऱ्यांसाठी पाच ते सहा मजली निवासस्थान उभारण्याचा प्रस्तावही तयार करण्यात येणार अाहे. या जागेचा वापर करून घेण्यासाठी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलही प्रस्तावित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...