आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेडिओ ट्रान्समीटरने 12 काेब्रांवर थायलंडमध्ये तरुणाचे संशोधन; जीवाची पर्वा करता हिरेनचा पुढाकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्प हाताळताना हिरेन खत्री - Divya Marathi
सर्प हाताळताना हिरेन खत्री

धुळे- थायलंडच्या घनदाट जंगलात रेडिओ ट्रान्समीटर लावून सोडण्यात आलेल्या अतिविषारी १२ काेब्रांवर परदेशी संशोधकांसोबत शहरातील हिरेन खत्री या तरुणाने संशोधन केले. मानवी हितासाठी जीवाची पर्वा करता हिरेन संशोधनात सहभागी झाला. सर्पदंश आणि शेतकऱ्यांचे होणारे मृत्यू या पार्श्वभूमीवर थायलंड शासनाने हे संशोधन केले. सर्पदंश रोखण्यासाठी केलेले हे संशोधन भारतातही उपयुक्त ठरणार असून, हिरेन संशोधनाचे निष्कर्ष शासनाला देणार आहे. 


काही तासांत मृत्यूच्या दारी पोहाेचवणाऱ्या काेब्रावर शहरातील हिरेन खत्री याने थायलंडला जाऊन केलेले संशोधन थक्क करणारे आहे. सर्पदंशामुळे शेतकऱ्यांचा होणारा मृत्यू रोखण्यासाठी थायलंड शासनाच्या या महत्त्वाकांक्षी संशोधन कार्यात भारतातून हिरेनची निवड झाली होती. राजधानी बंॅकॉकपासून उत्तरपूर्व दिशेला सुमारे ३०० किलोमीटर अंतरावरील घनदाट जंगलात हिरेनने सुमारे दोन महिने काेब्रावर संशोधन केले. थायलंडच्या सकिरान एन्हॉरोमेंट रिसर्च सेंटरतर्फे केलेल्या या संशोधनात हिरेनसोबत पोलंड, यूके, यूएई, इटलीतील संशोधक सहभागी झाले होते. इंडो-चायनीज स्पिटिंग कोब्रा मोनोकाल्ड कोब्रा अशा दोन प्रजातींमधील १२ अतिविषारी सर्पांच्या हालचाली टिपण्यासह त्यांचा अभ्यास करण्याची जबाबदारी हिरेनसह त्याच्या सहकाऱ्यांवर होती. त्यासाठी दोन्ही प्रजातीच्या काेब्राच्या शरीरात रेडिओ ट्रान्समीटर लावण्यात अाले हाेते. 


दिवसभरातील काेब्राच्या हालचाली, त्यांची शिकार करण्याची पद्धत आणि सर्पदंशावेळी कोब्राच्या हृदयाच्या ठोक्यांची हालचाल हिरेनने टिपली. एवढेच नव्हे तर वेळप्रसंगी रेडिओ सिग्नल-ट्रान्समीटरने पुन्हा काेब्रापर्यंत पोहाेचून त्याला पकडण्यासह आवश्यक नोंदी करण्याचे कामही त्याने केले. या संशोधनात छोटीशी चूकही जीवावर बेतू शकणारी होती. सुमारे ४५ दिवसांच्या या संशोधनात हिरेनने दोन्ही प्रजातीच्या कोब्रांसोबत विषारी ग्रीन व्हायपर इतर सर्पांबाबतही उत्सुकतेपोटी अभ्यास केला. सर्पज्ञान आणि त्यांचा मानवी जीवनासाठी होणाऱ्या सदुपयोगावर हिरेन प्रयत्नशील आहे. या संशोधनातून समोर आलेले निष्कर्ष भारतातही उपयुक्त ठरतील, असे हिरेनने सांगितले. भारतात कोब्राच्या दंशामुळे अनेकांचा मृत्यू होतो. त्यामुळे हिरेनचे संशोधन मोलाचे ठरेल. 


इंडो-चायनीज,मोनोकाल्ड कोब्रा 
इंडो-चायनीज स्पिटिंग कोब्रा मोनोकाल्ड कोब्रा हे अतिविषारी मानले जातात. भारतीय काेब्राच्या तुलनेत त्यांचे विष तेवढेच घातक आहे. यापैकी इंडो-चायनीज कोब्रा किमान सहा फूट लांबअसतो. सुमारे काही अंतरापर्यंत मानव अथवा शिकारीवर विषाचा मारा करू शकतो. त्यामुळेच त्याच्या नावापुढे स्पिटिंग शब्दप्रयोग केला जातो. सुमारे सात फुटांपर्यंत असलेला मोनोकाल्ड काेब्राही अधिक घातक मानला जातो. रागीट सर्प म्हणूनही त्याला ओळखले जाते. दंश करण्याची त्याची पद्धती काही क्षणात जीव घेऊ शकते. भारतातील पश्चिम बंगाल, बांगलादेश, म्यानमार, थायलंड या पट्ट्यात दोघी प्रजाती अधिक आढळतात. 

 
चीन, पश्चिम घाटात संशोधन 
हिरेनचेसंशोधन केवळ थायलंडपर्यंत मर्यादित नाही. त्याने यापूर्वी चीनमध्ये वन्यजीव संरक्षणावर संशोधन अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. २० देशांतील ८० जण या संशोधनात सहभागी होते. त्यातही हिरेन एकटा भारतीय होता. याशिवाय भारतातील तापी ते कन्याकुमारी अशा सुमारे एक हजार ६०० किलोमीटरच्या पश्चिम घाटातील सर्प, सरडा, पाली, बेडूक उभयचरांबद्दल त्याने संशोधन केले आहे. 


भारत-थायलंड शेतीप्रधान 
भारताप्रमाणेच थायलंड हा देशही शेतीप्रधान आहे. त्यामुळे थायलंडच्या दुर्गम-अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांचा काेब्राच्या दंशामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. संशोधनातून मोनोकाल्ड दाट जंगलात तर इंडो-चायनीज काेब्रा शेतात राहणे अधिक पसंत करतो. दोघांपैकी माेनोकाल्ड अधिक रागीट मानला जातो. असे संशोधनातून पुढे आले. या संशोधनातील निष्कर्षाचा उपयोग भारतीय काेब्रासाठी तसेच सर्पदंश त्यानुरूप औषधनिर्मितीसाठीही होऊ शकतो. 


भारतालाही व्हावा लाभ 
शासनाला संशोधनातील निष्कर्ष आवश्यक सहकार्य करण्यास तयार आहे. या संशोधनाचा लाभ भारतालाही व्हावा, अशी इच्छा आहे. संशोधनासाठी आई-वडील नीता गिरीश खत्री यांनी सहकार्य केले. लहान भाऊ चिरागही आवर्जून मदत करतो. कुटुंबीय पाठिंबाच देत नाही तर त्यांच्या निदर्शनास येणाऱ्या वन्यजीवांबद्दलही ते माहिती देतात. त्यामुळे त्यांची भूमिका मोलाची आहे. 
-हिरेनखत्री, वन्यजीव सर्प संशोधक

बातम्या आणखी आहेत...