आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीस्वारांनी 70 मिनिटांत लांबवल्या 3 सोनसाखळ्या; रस्त्यावर एकट्या पाहून केले टारगेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालकांचा जळगाव दौरा संपताच चाेरट्यांनी शहरात धुमाकूळ सुरू केला. गुरुवारी रात्री ७.१० ते ८.२० वाजेदरम्यान दुचाकीवरील दोन चाेरट्यांनी शिरसोली रस्ता, गणेश कॉलनी कासमवाडीत तीन महिलांच्या गळ्यातून 3 साेनसाखळ्या लंपास केल्या. एक महिला तरुणाने चाेरट्यांचा पाठलाग केला पण ते सापडले नाही. दरम्यान, तिन्ही घटनांमध्ये एकूण ६८ ग्रॅम वजनाच्या सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या साेन्याच्या गळसरी चाेरट्यांनी लंपास केल्या. 


अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेंद्र सिंह तीन दिवसांपासून शहरात तपासणीसाठी होते. गुरुवारी दुपारी ३.३० वाजता ते मुंबईकडे रवाना झाले. त्यांच्या दौऱ्यात संपूर्ण जिल्हा पोलिस दालातील अधिकारी, कर्मचारी ‘अटेन्शन’ होते. दौरा पूर्ण होताच सुटकेचा नि:श्वास सोडणाऱ्या पोलिसांना सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा कामाला लावले. दुचाकीवरून रपेट मारत चाेरट्यांनी रात्री ७.१० वाजता शिरसोली रस्त्यावर धावत्या दुचाकीवरून जाणाऱ्या ज्याेती नेमाने यांची दोन तोळे वजनाची सोनसाखळी ओढली. 


त्यानंतर रात्री ७.४५ वाजता गणेश कॉलनीत रस्ता ओलांडणाऱ्या प्रमिला चौधरी यांच्या गळ्यातील तोळे ग्रॅम वजनाची सोनसाखळी लंपास केली. नंतर रात्री ८.२० वाजता नेरी कासमवाडीतून भाविका सुमित लोढा यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची साेन्याची पाेत लंपास केली. या तिन्ही घटना शहरातील दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडल्या. त्यामुळे दोन्ही पोलिस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांनी चोरट्यांचा शाेध घेतला पण ते सापडले नाही. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. बुधवारी रात्री ९.१५ वाजता अक्षरा एन.पी. या तरुणीच्या गळ्यातील एक तोळ्याची सोनसाखळी लंपास झाली होती. 


शिव कॉलनीपर्यंत केला पाठलाग 
चौधरीयांच्या गळ्यातून सोनसाखळी ओढल्यानंतर चोरट्यांनी पळ काढताच बंटी नावाच्या दुचाकीस्वाराने त्यांचा पाठलाग केला; पण चोरटे गणेश कॉलनी मार्गे महामार्गावरून शिव कॉलनीकडून खोटेनगरच्या दिशेने निघून गेले. बंटीने बरेच अंतर चोरट्यांचा पाठलाग केला; परंतु चोरट्यांच्या दुचाकी चालवण्याच्या वेगामुळे ताे माघारी फिरला. एका चोरट्याने राखाडी रंगाचे जॅकेट घातले होते. 


मंदिराचे सीसीटीव्ही फुटेज तपासणार... 
घटना २, वेळ : ७.४५ :
चोरट्यांनीशिरसोली रस्त्यावरून आडमार्गाने पुन्हा शहरात अाले. त्यांनी गणेश कॉलनीतील साईबाबा मंदिर परिसरातून प्रमिला दिलीप चौधरी (रा.नंदनवन कॉलनी) यांच्या गळ्यातून दोन तोळे वजनाची सोनसाखळी ओढली. चौधरी ह्या नवीपेठेतील गणपती मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शन घेतल्यानंतर त्या रिक्षाने साई मंदिराजवळ उतरल्या. रस्ता ओलांडत असताना दुचाकीने आलेल्या भामट्यांनी त्यांची सोनसाखळी ओढली. रस्त्यावर अंधार असल्यामुळे त्यांना चोरटे िकंवा दुचाकी व्यवस्थित दिसली नाही. बंटी नावाच्या एका दुचाकीचालकाने चाेरट्यांचा पाठलाग केला पण ते सापडले नाही. चाैधरी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाणे येथे माहिती दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक गजानन राठोड यांच्या पथकाने घटनास्थळाला भेट दिली. दरम्यान, साई मंदिराचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाेलिसांना शुक्रवारी मिळणार अाहे. 


अर्धा किलाेमीटरपर्यंत अाेव्हरटेक....
घटना: वेळ ७.१०:
मेहरूणतलाव परिसरातील लेक प्राइड अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या ज्योती विद्याधर नेमाने ह्या शिरसोली नाका परिसरातून दुचाकीने (क्रमांक एमएच-१९, बीयू, ३५२१) घरी जात होत्या. या वेळी त्यांच्या मागून आलेल्या दाेन चाेरट्यांनी नेमानी यांच्या दुचाकीला अर्धा किमीपर्यंत दोन वेळा ओव्हरटेक केले पुन्हा दुचाकीची गती कमी करून मागे थांबले. मेहरूण तलावकडे जाण्याचे पहिले वळण येताच अंधाराचा फायदा घेत चाेरट्यांनी धावत्या दुचाकीवरील ज्याेती यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढली. त्यावेळी ज्योती यांनी त्याचा पाठलाग केला; परंतु चाेरट्यांनी एका ट्रकला ओव्हरटेक करून धूम ठाेकली. चाेरट्यांच्या दुचाकीचा मागचा दिवा मंद असल्यामुळे ज्याेती यांना दुचाकीचा क्रमांक दिसला नाही. घटनेनंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिरुद्ध आढाव, उपनिरीक्षक रोहन खंडागळे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. 


अंधाराचा फायदा घेत चाेरली पाेत...
घटना ३, वेळ ८.२० वाजता :
चोरट्यांनीअयोध्यानगरात माहेरी अालेल्या पहूर येथील सासर असलेल्या भाविका सुमित लोढा या विवाहितेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोनसाखळी लंपास केली. त्या दुचाकीने कासमवाडी परिसरात एका दुकानावर खरेदीसाठी आल्या होत्या. दुकान बंद असल्यामुळे त्या परत जाण्यासाठी निघाल्या. त्या वेळी त्यांची दुचाकी बंद पडल्याने त्या दुचाकी वळवत हाेत्या. तितक्यात अंधाराचा फायदा घेत चाेरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चाेरून एमआयडीसीच्या दिशेने धूम ठाेकली. याप्रकरणी भाविका यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली अाहे. 

बातम्या आणखी आहेत...