आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राँगसाइड भरधाव डंपरची रिक्षाला धडक; नागरिकांनी महामार्ग राेखला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महामार्गावर ओव्हरटेक करीत राँगसाईडने सुसाट निघालेल्या डंपरने मंगळवारी रात्री गुजराल पंपाजवळ एका रिक्षाला जोरदार धडक दिली.धडक दिल्यानंतर हा टँकर शेजारीच असलेल्या एका दुधाच्या टँकरवर जाऊन आदळला. डंपरची धडक एवढी जबर होती की रिक्षा पूर्णपणे चेपून रिक्षाचालक त्यात अडकला. नागरिकांनी यावेळी अर्धातास महामार्ग रोखून धरला. दुसरीकडे संतप्त जमावाने क्लिनरला बाहेर काढून बेदम चोप दिला. मात्र या गोंधळात डंपरचालक पळून गेला. जमावाने क्लिनरला पोलिसांच्या स्वाधीन केले मात्र नंतर तोही संधीसाधून पोलिसांच्या तावडीतून पसार झाला. धडक दिल्याचा जोरदार आवाज होताच नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन रिक्षा चालकाला बाहेर काढले. एवढ्या मोठ्या अपघातातून सुदैवाने तो सुखरुप बचावला. 


रांॅगसाईडने रिक्षाला जाेरदार धडक दिली. यावेळी डंपरचा वेग एवढा हाेता की रिक्षाला धडक देऊन तो जवळच उभ्या असलेल्या दुधाच्या टंॅकरवर (क्रमांक एमएच १९ झेड ५०८७ ) अादळला. धडकेमुळे रिक्षाचा पुढील भाग पूर्णपणे चेपला जाऊन त्यात रिक्षा चालक सुनिल रहेमानखांॅ तडवी (वय २५,रा.ईच्छादेवी मंदिराजवळ) हा दाबला गेला. त्याच्या दाेन्ही पायाला, हाताला व डाेक्याला मार लागला अाहे. तसेच डाेके रिक्षावर अादळून कपाळाला जखम झाली अाहे. अपघाताच्या जाेरदार अावाजाने चाैकात उपस्थित असलेल्या जमावाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन रिक्षाचालकाला लगेच बाहेर काढले. यावेळी डंपरवरील चालक वाहन जावेवर साेडून पळून गेला. त्यामुळे जमावाने डंपरच्या क्लिनरला बाहेर काढून मारहाण केली. त्यानंतर रामानंदनगर पोलिसांच्या स्वाधीन केले.

 
चाैक बनला वाळू वाहनचालकांचा अड्डा
गुजराल पंप चाैकात २/३ बिअर बार, वाईन शाॅप व देशी दारुचे दाेन दुकान अाहेत. त्यामुळे गिरणा नदीतून अवैध वाळू वाहतूक करणारे टॅक्ट्ररचालक व डंपर चालक मद्यपानासाठी या चाैकात वाहन उभे करून नेहमी उभे राहतात. सायंकाळी माेठ्या संख्ये वाळू वाहतूक करणारी वाहन या ठिकाणी असतात. त्यामुळे अनेकदा अपघात हाेतात. 


क्लिनरला पळवून लावल्याचा अाराेप 
जमावाने डंपरवरील क्लिनरला मारहाण करून पाेलिसांच्या स्वाधीन केले हाेते. थाेड्या वेळाने रामानंद पाेलिस ठाण्याचे निरिक्षक बी.जे. राेहम जादा पाेलिस कुमक घेऊन घटनास्थळी दाखल झाले. अगाेदर घटनास्थळी आलेल्या पाेलिसांनी पकडून दिलेल्या क्लिनरला पळून जाण्यास मदत केल्याचा अाराेप जमावाने केला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात डंपरचालक कैलास दत्तू पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

 

टँकरमुळे वाचला माेठा अनर्थ 
गुजराल पेट्राेल पंप चाैक नेहमीच गजबजलेला असतो. तिथे दुधाचा टँकर थांबलेला होता. बाहेरगावी जाण्यासाठी निघालेला दूध टँकरचा चालक घरून येणारा जेवणाचा डबा घेण्यासाठी रस्त्याच्या बाजूला उभा हाेता. रिक्षाला धडक देऊन टँकरवर अादळून थांबल्यामुळे डंपर पुढे जाऊ शकले नाही. अन्यथा बाजूलाच असलेल्या चायनीजच्या गाडीवर खाणाऱ्या १०-१२ जणांच्या अंगावर डंपर गेले असते. अपघातानंतर नागरिकांची गर्दी झाली. 


जागेवरच केली भरपाईची मागणी 
अपघाताची माहिती सुनील तडवी याच्या नातेवाइकांना मिळाल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपस्थित पाेलिसांनी क्लिनरला पळवून लावल्याचे सुनीलची अाई व भाऊ यांनी निरीक्षक राेहम यांना सांगितले. त्यांनी पाेलिस ठाण्यात येऊन गुन्हा दाखल करण्याबाबत त्यांना सांगितले. या वेळी सुनीलच्या अाईने रिक्षाची नुकसान भरपाई देण्याबाबत लेखी देण्याची मागणी राेहम यांच्याकडे केली. 

 

चार रुग्णवाहिकांना साेडले 
क्लिनरला मारहाण करून पाेलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर जमावाने महामार्गावर येऊन दाेन्ही बाजूच्या वाहनांना राेखले. त्यासाठी तरुणांनी महामार्गावरच उभे राहून ठिय्या केला. त्यामुळे दाेन्ही बाजुला सुमारे एक ते दीड किलाेमीटर वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. या वेळी जमावाने दाेन्ही बाजूने येणाऱ्या व जाणाऱ्या चार रुग्णवाहिन्यांसाठी मात्र रस्ता मोकळा करुन दिला. 

बातम्या आणखी आहेत...