आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीसमोर अचानक मोकाट जनावरे आल्याने अपघात; 2 जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुचाकीवरील गंभीररित्या जखमी झालेला युवक. - Divya Marathi
दुचाकीवरील गंभीररित्या जखमी झालेला युवक.

यावल (जळगाव)- शहरातील फैजपूर रस्त्यावर श्री मनुदेवी मंदिराजवळ दुचाकी वाहना समोर अचानक मोकाट जनावरे आल्याने  झालेल्या अपघातत  दोन जण जखमी झाले आहेत. यापैकी एकास जबर दुखापत झाली आहे. हा अपघात शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला.

 

 

शहरात मोकाट गुरांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. पालिकेकडून मोकाट गुरांवर कुठलीच कारवाई होत नाही. मोकाट गुरांमुळे अपघात देखील घडू लागले आहेत. शुक्रवारी शहरातील आठवडे बाजार भागातील रहिवासी दानिश भिका पटेल (वय १८)  हा आपल्या मित्र जयेश बैरागी (वय १८) सोबत दुचाकीवरुन (एम.एच. १९ सी. ए. ५९९९) फैजपूर रस्त्यावरील महाविद्यालयातून घरी परतत होता. श्री मनुदेवी मंदिरा जवळून जात असतांना दुचाकीसमोर अचानक मोकाट जनावरे आली.  दुचाकीवरून त्याचा तोल गेला व दोघे रस्त्याच्या कडेला फेकले गेले. त्यात दाेघे जखमी झाले. दोघांना तात्काळ येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. येथे डॉ. दिनेश देवराज, डॉ. रश्मी पाटील, शितल ढोंबरे, जयश्री गडकरी आदींनी उपचार केले. त्यात दानिश पटेल यास डोक्याला गंभीर दुखापत तर हाता पायांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. तर बैरागी यास किरकोळ इजा झाली आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...