आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ रस्त्यावर दुचाकी घसरल्याने 3 जण जखमी; 2 वर्षाचा चिमुकला गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जखमी राहुल बारेला. - Divya Marathi
जखमी राहुल बारेला.

यावल (जळगाव)- दुचाकी घसरल्याने तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेत एक दोन वर्षाचा चिमुकलाही गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारार्थ जिल्हा सामान्य रूग्णालयात हलवण्यात आले आहे.

 


मध्य प्रदेशातील मुळ रहिवासी असलेले सुनील लकड्या बारेला हे यावल शहरातील एका शेतकऱ्याकडे सहकुटुंब कामाला आहेत. ते दुचाकीवरुन (एम.पी. 68 एम. डी.0579)  त्याची पत्नी बिना सुनिल बारेला (वय 28) व मुलगा राहुल सुनिल बारेला (वय 2 वर्ष) यांना घेऊन मध्य प्रदेशात लग्नाकरिता जात हाेता. दरम्यान भुसावळ रस्त्यावरील शेतातुन कुटुंबासह यावल शहरात येत असतांना रस्त्यावर त्याची दुचाकी घसरली. त्यात तिघे जखमी झाले. त्यात त्यांच्या दोन वर्ष वयाच्या मुलाचा उजवा हात मोडला व डोक्यास गंभीर दुखापत झाली. या तिघांवर ग्रामीण रूग्णालयात डॉ. रश्मी पाटील, जयश्री गडकरी, पल्लवी सुरवाडे यांनी प्राथमिक उपचार केले. तिघांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आहे आहे. शहरात गेल्या काही दिवसापासुन सतत अपघात घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...