आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदीच्या पेपरला 12 विद्यार्थ्यांवर कारवाई; काॅपी बहाद्दरांमध्ये जळगावचे दहा विद्यार्थी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- बारावीच्या हिंदीच्या पेपरला गुरूवारी जिल्ह्यात १२ काॅपीबहाद्दर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात अाली. केली अाहे. यात १० विद्यार्थी जळगाव शहरातील तर २ विद्यार्थी भुसावळ येथील अाहे. 


बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून इंग्रजीच्या पेपरने सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी जिल्ह्यात ८ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात अाली. प्रत्येक केंद्रावर बैठे पथक नियुक्त केल्यामुळे काॅपीला काही प्रमाणात अाळा बसला हाेता. गुरूवारी सकाळी ११ ते २ वाजे दरम्यान हिंदीच्या पेपरला डाएटचे प्राचार्य डाॅ. गजानन पाटील यांच्या पथकाने जळगाव शहरातील केंद्रांना भेटी दिल्या. पथकाने नूतन मराठा महाविद्यालयात २ विद्यार्थी, मू. जे. महाविद्यालयात १ विद्यार्थी, सिद्धीविनायक महाविद्यालयात ७ विद्यार्थी तर भुसावळ येथे बी. झेड. उर्दू हायस्कूलमध्ये २ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात अाली. या कारवाईनंतर बऱ्याच केंद्रावर पथक बसून हाेते. त्यामुळे काही प्रमाणात काॅपीला अाळा बसला हाेता. तर काही ठिकाणी काॅपी पुरविणाऱ्यांनी उच्छाद मांडला हाेता. 


विशेष दक्षता 
काॅपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काैस्तुभ दिवेगावकर यांनी काही महत्वाच्या पेपरला परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक नियुक्त केले अाहे. या पथकामध्ये वर्ग १ अाणि वर्ग २ च्या अधिकाऱ्यांचा समावेश अाहे. दरम्यान, पहिल्या दिवशी शहरातील एका केंद्रावर अर्धा तास अगाेदर पेपर देण्यात अाल्याची तक्रार अाल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रशासन, माध्यमिक शिक्षण विभागाने विशेष दक्षता घेतली हाेती. 


२६१ विद्यार्थी गैरहजर 
बारावीच्या परीक्षेला जिल्ह्यात ७१ केंद्रावर ५१ हजार ३०८ विद्यार्थी बसले हाेतेे. हिंदीच्या पेपरला यापैकी २६१ विद्यार्थी गैरहजर हाेते.

बातम्या आणखी आहेत...