आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंठा चौफुलीवर पुन्हा झाला अपघात: ट्रकची दुचाकीला धडक; तरुण गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- भुसावळ येथून ड्यूटी संपवून जळगावी घरी परतलेला रेल्वे कर्मचारी तरुणाच्या दुचाकीला अजिंठा चौफुलीवर ट्रकने जोरदार धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला असून खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता हा अपघात घडला. 


नरेंद्र साहेबराव साळुंखे हा तरुण अजिंठा हौसिंग सोसायटी येथे राहतो. तो भुसावळ येथे रेल्वे विभागात नोकरीस आहे. दररोज दुचाकीने (एमएच १९ सीएम ७६३७) भुसावळला अप-डाऊन करीत आहे. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे ड्यूटीवर गेला होता. मंगळवारी सकाळी १० वाजता घरी परतत असताना अजिंठा चौफुलीवर मागून येणाऱ्या ट्रकने (टीएन २८ बीए ४४८९) त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात तो दुचाकीसह रस्त्याच्या कडेला फेकला गेला. अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. 


रस्त्यावरील इतर वाहनचालकांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. घरापासून काही अंतरावरच अपघात झाल्यामुळे परिसरातील लोकांसह कुटुंबीयांना लवकर माहिती मिळाली. त्यानंतर सर्वांनीच जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. दुपारी १२ वाजता त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 


ट्रकसह चालक ताब्यात 
अपघातानंतरएमआयडीसी पोलिसांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले होते; परंतु साळुंखे कुटुंबीयांनी तक्रार दिल्यामुळे समज देऊन त्याला सोडून देण्यात आले. अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले आहे. ट्रकचालकाने नुकसान भरपाई दिली होती. 
 

चौक झाला जीवघेणा
अजिंठा चौफुलीवर गेल्या पंधरवड्यात वेगवेगळ्या दोन अपघातांमध्ये दोघांना जीव गमवावा लागला आहे. यात एक पोलिस कर्मचारी मृत्युमुखी पडला आहे. चौकात वाढलेले अतिक्रमण, अरुंद रस्ते वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे दररोज अपघात होत अाहेत. त्यामुळे हा चौक जीवघेणा झाला आहे. मंगळवारी नशिब बलवत्तर म्हणून नरेंद्र या अपघातातून बचावला. 

बातम्या आणखी आहेत...