आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेर येथे कळमसरे, दोंडाईचा येथील घटनेच्या निषेधार्थ मुकमोर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर (जळगाव)- अमळनेर महिला मंचच्या वतीने कळमसरे व दोंडाईचा येथील घटनेचा विरोधात मुकमोर्चा काढण्यात आला व प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. घटनेचा महिला मंचच्या वतीने निषेध करत प्रांताधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले व कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली.

 


कळमसरे (ता. अमळनेर) येथे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाकडुन चिमुकल्या विद्यार्थीनींवर लैगिंक अत्याचार करण्यात आले. दोंडाईचा येथील नुतन हायस्कूल येथे शिकणाऱ्या पाच वर्षीय चिमुरडीचे चाॅकलेटचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करण्यात आले. या घटना शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या आहेत. यामुळे पालकांमध्ये चिंता आहे. त्यामुळे समाजात असंतोष आहे.

 

 

अमळनेर महिला मंचच्या वतीने निषेध करीत अमळनेर प्रांताधिकारी गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. या दोन्ही घटनेस जबाबदार नराधमांना कठोर शिक्षा व्हावी व पुन्हा शिक्षकी पेशात नियुक्ती करू नये. मुली आणि महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी. अमळनेर शहरात डी. आर. कन्या शाळा, प्रताप महाविद्यालय, सानेगुरुजी, मंगलमूर्ती चौक, तसेच भागवत खासगी क्लासेस परिसर याठिकाणी निर्भया पथक, साध्या कपड्यातील पोलिस अशी व्यवस्था करावी. बेशिस्त विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करावी. शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

 

 

भविष्यात अशा घटना घडु नयेत यासाठी शासनाने व प्रशासनाने योग्य व कठोर उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी डॉ.अपर्णा मुठे, तिलोत्तमा रविंद्र पाटील, जयश्री दाभाडे, योजना पाटील, प्रा. शिला पाटील, सुलोचना वाघ, माधुरी पाटील, रंजना देशमुख, विजया जैन, नयना कुलकर्णी, भारती गाला, वसुंधरा लांडगे, सरोज भांडारकर, उज्वला शिरोडे,पुष्पाबाई भामरे, पुष्पाबाई राजपूत, सुरेखा पवार, राजश्री पाटील, प्रियंका पाटील, सुनिता पाटील, सुनंदा बेन गुजराथी, संगीता भिल, वजाताई भिल, शितल सावंत, आशा चावरीया, विपुला नांढा, जासमीन भरुचा, कविता पवार, स्वाती एकतारे, रुपाली जोशी,विद्या हजारे, निशा दुसाने, करुणा सोनार, प्रतिभा कुलकर्णी,प्रगती काळे आणि 10 वीच्या विद्यार्थिनीं या घटनांचा निषेध करत मत व्यक्त केले.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो, माहिती आणि व्हिडीओ

बातम्या आणखी आहेत...