आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२१ दिवसांत पथकाने जप्त केले पिस्तूल, १० तलवारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - सहायक पाेलिस अधीक्षक नीलाेत्पल यांनी ३ मे राेजी स्थापन केलेले शस्त्रविराेधी पथक वरिष्ठांच्या आदेशाने शनिवारी बरखास्त केले. गेल्या २१ दिवसांपासून हे पथक विभागात कार्यरत हाेते. या पथकाने नियुक्तीपासून १० तलवारींसह एक गावठी पिस्तूलही जप्त केले. तसेच पसार असलेल्या एका संशयिताला अटक केली. 

 

शहरासह भुसावळ   विभागातील अवैधपणे शस्त्र बाळगणाऱ्यांविरूद्ध धडक कारवाईसाठी सहायक पोलिस अधीक्षक नीलाेत्पल यांनी शस्त्रविराेधी पथकाची स्थापना केली हाेती. या पथकात पाेलिस उपनिरीक्षक युवराज अहिरे, बंटी सैंदाणे, सुनील थाेरात, कृष्णा देशमुख, नीलेश बाविस्कर, दीपक जाधव यांचा समावेश होता. काेम्बिंग अाॅपरेशनमध्येही पथकाने दाेन तलवारी जप्त केल्या होत्या. मात्र, पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमुळे पथक बरखास्त करण्यात आले. 


केरळमधून संशयितास अटक 
बाजारपेठ पाेलिस ठाण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयित वासुदेवन नारायणन ( रा. पेराऊल, केरळ) याला पथकाने केरळ मधून अटक केली. तसेच २०१५ मध्ये बाजारपेठ पाेलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयीत कमल पुंजाजी कांडेलकर (वय २७, रा. पंचशीलनगर, भुसावळ) याला २४ एप्रिलला अटक केली हाेती. तसेच २०१७ मध्ये दाखल गुन्ह्यातील संशयीत समीर उर्फ धाेनी कृष्णाधन कर यालाही २४ एप्रिलला अटक केली हाेती. ६ मे राेजी टीव्ही टाॅवर परिसरात गावठी पिस्तूलासह किशाेर उर्फ गाेजऱ्या सकरू जाधवला ताब्यात घेतले. 

बातम्या आणखी आहेत...