आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकच्या गोळीबारात नियंत्रण रेषेवर धुळ्याचा जवान शहीद;आठ महिन्यांपूर्वीच झाला विवाह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी जवानांनी केलेल्या गोळीबारात शिंदखेडा तालुक्यातील खलाणे येथील जवान योगेश मुरलीधर भदाणे (२८) शनिवारी शहीद झाले. 


योगेश यांचा ८ महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. २ महिन्यांपूर्वी ते पत्नीला सोबत घेऊन गेले होते. योगेश सन २००८मध्ये सैन्यदलात भरती झाले. ते १०८ इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. शेतकरी कुटुंबातील योगेश भदाणे यांना दाेन विवाहित बहिणी असून दोन्ही मेहुणे सैन्यात आहेत. ८ महिन्यांपूर्वीच योगेशचा मंगरूळ येथील पूनम यांच्याशी विवाह झाला हाेता. त्यानंतर चार महिन्यांनी ते सुटीवर घरी आले होते. दोन महिन्यांपूर्वी ते पत्नीला सोबत घेऊन गेले होते. योगेश यांच्या पश्चात पत्नी, वडील मुरलीधर, आई मंदाबाई, दोन बहिणी असा परिवार आहे.

 

खलाणे गावावर शोककळा...
-योगेश भदाणे यांना विरमरण आल्याची बातमी खलाणे येथे समजताच सर्वत्र शोककळा पसरली आहे.
- योगेश यांना एप्रिल-2017 मध्ये विवाह झाला होता. मागील दोन महिन्यांपासून पत्नी पूनम त्यांच्यासोबत सैन्य दलाच्या कॅम्पसमध्ये राहत होती.

 

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पुंछच्या सीमेवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला. या एक मुलगा जखमी झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...