आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहा-उद्धव ठाकरेंची भेट ही अार्थिक साैदेबाजी : अशाेक चव्हाण यांचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- भाजप अाणि शिवसेनेची लुटुुपुटुची लढाई ही राजकीय षडयंत्र अाहे. जनतेची दिशाभूल करून राजकारण करणारी शिवसेना ही सत्तेसाठी लाचार झालेली अाहे. गेल्या महिन्यात झालेली अमित शहा अाणि उद्धव ठाकरे यांची भेटही अार्थिक साैदेबाजी असल्याचा अाराेप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशाेक चव्हाण यांनी केला. दरम्यान, एमअायएम हे भाजपचेच पिल्लू असल्याचा देखील अाराेप त्यांनी केला. 


जळगाव शहर काँग्रेसचा मेळव्यात खासदार चव्हाण बाेलत हाेते. या वेळी त्यांनी यापुढच्या निवडणुका भाजप विराेधात १० पेक्षा अधिक पक्ष एकत्रित येऊन महाअाघाडीने लढणार असल्याचे ते म्हणाले. शिवसेना हा सत्तेसाठी लाचार पक्ष अाहे. चार वर्षांपासून त्यांनी दरराेज सत्तेतून बाहेर पडण्याच्या घाेषणा केल्या, प्रत्यक्षात लाचाराप्रमाणे सत्तेला चिटकून राहिले. बाहेर ज्या सरकारविराेधात बाेंबा मारतात त्याच सरकारच्या निर्णय प्रक्रियेत शिवसेना अाहे. भाजपवर नाराज असलेल्यांना पर्याय देण्यासाठी ही शिवसेनेची ही नौटंकी असल्याचा अाराेप खासदार चव्हाण यांनी केला. यापुढच्या निवडणुका ईव्हीएम एेवजी बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी त्यांनी केली. सर्व पक्षांना एकत्रित अाणण्याचे काम सुरू आहे.


योग शिकवण्यापेक्षा पोटाला भाकरी द्या 
लाेकांना पाेटाला भाकर नसताना त्यांना याेग शिकवून उपयाेग नाही. बेराेजगारांना राेजगार दिला नाही. काेणतेही अाश्वासन पूर्ण केले नाही. शेतकऱ्यांना संपावर जाण्याची वेळ अाली. 

बातम्या आणखी आहेत...