आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीक्षेत्र पद्मालय देवस्थान अध्यक्षपदी अशोक जैन; विश्वस्तांच्या बैठकीत एकमताने निवड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पद्मालय संस्थानच्या अध्यक्षपदी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची एकमताने निवड झाली. श्रीक्षेत्र पद्मालय येथे शुक्रवारी मंदिर विश्वस्तांची बैठक पार पडली. त्यात संस्थानचे माजी अध्यक्ष अर्जुन पाटील व विद्यमान अध्यक्ष अमृत कोळी यांनी ही घोषणा केली. विश्वस्तांच्यावतीने नवनियुक्त अध्यक्ष अशोक जैन यांचा सत्कार करण्यात आला. 


शुक्रवारी सायंकाळी श्रीक्षेत्र पद्मालय विश्वस्त मंडळाची सभा बोलवण्यात आली होती. सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली. श्रीक्षेत्र पद्मालयाच्या विकासासाठी भक्कम नेतृत्वाची आवश्यकता असून त्यासाठी अशोक जैन यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी, असा ठराव ज्येष्ठ सदस्य संस्थानचे अध्यक्ष अमृत कोळी यांनी मांडला. या ठरावास सर्व सदस्यांनी एक मताने मंजुरी दिली. त्यास अर्जुन पाटील यांच्यासह सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले. या वेळी संस्थानचे विश्वस्त डॉ. पी.जी. पिंगळे यांचाही सत्कार करण्यात आला. गेल्या २५ वर्षांपासून डॉ. पिंगळे हे श्री क्षेत्र पद्मालय, श्री क्षेत्र मनुदेवी, नस्तनपूर आणि सप्तश्रुंगी देवस्थानला भाविकांसाठी मोफत उपचार औषधोपचार शिबिराचा उपक्रम चालवित आहेत. त्यांच्या या सेवाभावी कार्याबद्दल पद्मालय देवस्थानच्यावतीने मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी माजी अध्यक्ष आनंदराव पाटील, गोकुळ देशमुख, भिका पाटील, शिरीष बर्वे, डॉ. पी.जी. पिंगळे, राजेश तिवारी, अमित पाटील, गणेश वैद्य आदी विश्वस्त, अशोक पाटील डोणगावकर, आनंद गुप्ते, पत्रकार शैलेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. 


भाविकांना सुविधा उपलब्ध करून देणार 
श्रीक्षेत्र पद्मालयाच्या धार्मिक पर्यटन आणि अन्य महत्त्वाच्या सोयीसुविधा भाविकांना पुरविण्याच्यादृष्टीने पावले उचलली जातील. येणाऱ्या पर्यटकास पद्मालयाचे पौराणिक महत्त्व चित्र व म्युरल प्रदर्शनाच्या माध्यमातून दिसेल, अशी व्यवस्था करण्यात येईल. हे देवस्थान सर्व सुविधांनी युक्त उत्तम लौकीक मिळवण्याच्या दृष्टीने विकसित करण्यात येईल. यासाठी अध्यक्ष व संचालक मंडळ कटिबद्ध असेल, असे अशोक जैन या वेळी म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...