आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कोरेगाव-भीमा दंगलीच्या चौकशीतून षडयंत्र उघड होण्याची शक्यता\': बबनराव पाचपुते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे- कोरेगाव-भीमा दंगलीच्या चौकशीतून निश्चितपणे मोठे षडयंत्र उघड होण्याची शक्यता, असे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी सांगितले. श्रीगोंदे तहसीलसमोर दलित समाजातर्फे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आयोजित केलेल्या धरणे अांदोलनात ते बोलत होते. 


श्रीगोंदे तहसील कार्यालयसमोर सेामवारी भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करावी आणि श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव येथील दलित मुलांना चौकशी न करता त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली असल्याने त्यांना सोडून द्यावे या मागणीसाठी मागासवर्गीयांच्या वतीने आंदोलन आयोजित केले होते. या प्रसंगी पाचपुते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भीमा कोरेगाव दंगलीच्या चौकशीसाठी आग्रही मागणी केली असून त्या चौकशीतून नक्षलवादासारखे संघटन सुध्दा असू शकते किंवा मोठे षङयंत्र उघड होण्याची शक्यता आहे. मात्र, तालुक्यातील तीन दलित मुलांना अटक झालेली असून त्याची माहिती घेऊ, असे पाचपुते म्हणाले, यावेळी सभापती पुरुषोत्तम लगड, संभाजी बोरुडे, युवा नेते संदीप नागवडे, माजी उपनगराध्यक्ष जालिंदर घोडके, अनिल ठवाळ, मुकुुंद सोनटक्के, चंदन घोडके, सुनील ओव्होळ आदी उपस्थित होते. या वेळी पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार आणि पोलिस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

 

कोरेगाव-भीमा दंगलीच्या चौकशीतून निश्चितपणे मोठे षडयंत्र उघड होण्याची शक्यता, असे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी सांगितले. श्रीगोंदे तहसीलसमोर दलित समाजातर्फे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आयोजित केलेल्या धरणे अांदोलनात ते बोलत होते. 

बातम्या आणखी आहेत...