आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल येथे कोरेगाव भीमा येथील हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ बहुजन क्रांती समितीचा मोर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल (जळगाव)- कोरेगाव भीमा येथील हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी येथे बहुजन क्रांती समितीकडून या माेर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले.

 


बहुजन क्रांती समितीच्या वतीने मंगळवारी सकाळी 11 वाजता मोर्चेकरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात एकत्र झाले व तेथुन तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.  कोरेगाव भीमा येथील भ्याड हल्ल्याचा निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. मिलिंद एकबोटे, मनोहर उर्फ संभाजी भिडे  यांना त्वरित अटक करावी. राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांचा यावेळी निषेध करण्यात आला. निवेदनावर अध्यक्ष कुंदन तायडे, अजय इंगळे, समाधान इंगळे, विकास तायडे, पंकज तायडे, प्रदिप इंदवेे, सागर अट्रावलकर, प्रतिक पारधे, प्रकाश पारधे, सागर गजरे, राजु सुरवाडे, संतोष डांबरे, ज्ञानदेव भालेराव, निलेश सपकाळे, विशाल गजरेे, सिध्दार्थ तायडे, आकाश तायडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. तहसिल कार्यालयात निवासी नायब तहसिलदार वैभव पवार यांच्याकडे मोर्चेकऱ्यांनी निवेदन दिले. यावेळी पोलिस निरिक्षक डी. के. परदेशी उपस्थित होते.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...