आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंडगिरीच्या विरोधात मराठा समाजाचा मोर्चा;धुळ्यातील अांदाेलनाला 21 संघटनांचा पाठिंबा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- संयम-शिस्तीचा परिचय देत व गुंडगिरी, अवैध धंद्यांविराेधात शहरातून  शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला. सुमारे दीड लाख नागरिक मोर्चात सहभागी झाले होते, असा दावा संयाेजकांकडून करण्यात आला. या मोर्चाला व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला होता. मोर्चासाठी ७०० पोलिस तैनात करण्यात आले होते. मोर्चाला विविध २१ संघटनांनी पाठिंबा दिला होता.   


कोरेगाव भीमातील हिंसाचाराच्या  घटनेनंतर शहरातून निघालेल्या मोर्चात महापुरुषाबद्दल अवमानकारक उद‌्गार काढण्यात अाल्याचा अाराेप हाेत अाहे. तसेच काही दुकाने, घरांवर दगडफेक झाली होती. त्याविरोधात शुक्रवारी मराठा  समाज व इतर समाजबांधवांनी काढलेल्या मोर्चात रोष दिसून आला. मात्र अांदाेलकांनी संयम व शिस्तीचा परिचय करून दिला. छेडखानी, खोटे गुन्हे, महापुरुषांचा अवमान सहन केला जाणार नाही. अन्याय करणार नाही तसेच होऊ देणार नाही, हा शिवसंस्कार पाळाला जाईल. गुंडगिरी रोखण्यात पोलिस अपयशी ठरले तर कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना अद्दल घडवू, असा निर्धार व्यक्त करण्यात अाला.  

 

राज्यभरात निघाले 57 विराट मोर्चे...  
गेल्यावर्षी राज्यभरात निघालेल्या 57 विराट मराठा क्रांती मोर्च्यांद्वारे मराठ्यांच्या एकजूट आणि वज्रमुठीचे दर्शन सरकार-समाजालाही झाले होते. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी गावात घडलेल्या मुलीवरच्या बलात्काराच्या एका घटनेने, असंतोषाची ठिणगी मराठा समाजात पडली आणि बघता बघता राज्यभरात मराठी क्रांती मोर्च्यांचा वणवा पसरला. या मोर्च्यांची सांगता राजधानी मुंबईत लक्षावधींच्या विराट मोर्च्याने 9 ऑगस्ट क्रांतिदिनी झाली.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... मराठा क्रांती मोर्चाचे फोटो आणि व्हिडिओ..

बातम्या आणखी आहेत...