आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखरपुड्यासाठी बुक केलेली बस पाठवली नाही, बसमालक, चालकास एका वर्षाची कैद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- साखरपुड्यासाठी बुक केलेली बस न पाठवल्यामुळे जळगावातील पुराेहित टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या दाेघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी १ वर्षाची कैद व दंडाची शिक्षा सुनावली.   

 
 बोरनार येथील दिनकर वासुदेव चौधरी यांनी मुलगा प्रशांतच्या साखरपुड्यासाठी पुरोहित ट्रॅव्हल्सची बस बुक केली. यासाठी ७५०० रुपये अागाऊ भरले. ११ एप्रिल २०१५ रोजी रात्री १० वाजेपर्यंत बस बोरनारला पोहोचणे अपेक्षित होते. परंतु न आल्याने त्यांनी ट्रॅव्हल्सचे अजय पुरोहित व कर्मचारी सचिन अशोक मोरे, मनोज अजबराव बोरसे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी बस पाठवतो म्हणत वेळ मारून नेली. परंतु पाठवलीच नाही. ऐनवेळी अन्य वाहनाची व्यवस्था करावी लागली.नंतर चौधरींनी बसमालकाडे अागाऊ रकमेची मागणी केली. त्यांनी ती देण्यास टाळाटाळ केली. चौधरींनी १५ एप्रिल २०१५ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन मोरे, अजय पुरोहित व मनोज बोरसेविरोधात गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...