आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन् हळदीचा कार्यक्रम सुरू असतानाच लग्न मंडपातून पळाली नववधू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- भोसरी(पुणे) येथून विवाह सोहळ्यासाठी जळगावात दाखल झालेल्या नववधूने हळदीच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असतानाच पलायन केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी वाजता विश्वकर्मानगर (रामेश्वर कॉलनी) येथे घडली. दोन्ही कुटुंबियांनी एकमेकांवर आरोप करीत पोलिस ठाणे गाठले. वधूच्या पालकांना ५० हजार रूपये देण्याचे ठरले होते. यामुळेच फसवणूक केल्याचा आरोप वराकडील लोकांनी केला आहे. 


विश्वकर्मानगर येथील भाजीपाला विक्री करणाऱ्या एका तरुणाचे ११ नोव्हेंबर रोजी भोसरी येथील मुलीशी विवाह ठरला होता. दोन्ही वेगवेगळ्या समाजाचे असल्यामुळे मुलाच्या शेजारी राहणाऱ्या एका दाम्पत्याने मध्यस्ती करून हे लग्न जुळवून आणले होते. विवाहापोटी मुलीच्या आई-वडिलांना ५० हजार रूपये देण्याची बोली करण्यात आली होती. त्यानुसार २५ नोव्हेंबर रोजी जळगावात मुलाकडेच साखरपुडा झाला होता. तर १३ डिसेंबर रोजी मुलाकडेच लग्न सोहळा होणार होता. त्यासाठी नववधू आपल्या आई-वडील लहान भावासह १० डिसेंबर रोजी जळगावात दाखल झाली होती. 


दुसऱ्या दिवशी ११ रोजी सायंकाळी वधू-वरांचे कपडे खरेदी करण्यात आले. तर १२ रोजी दुपारी वाजता हळदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी मंडपात लगबग सुरू असतानाच उसाचा रस घेऊन येण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडलेली नववधू बराच वेळ परतलीच नाही. यामुळे संपूर्ण रामेश्वर कॉलनीत एकच गोंधळ उडाला होता. अंगणात मंडप टाकून हळदीच्या तयारीत असलेले लोक मुलीच्या शोधासाठी एकवटले होते. संशय आल्यानंतर तिचा शोध सुरू झाला; परंतुसायंकाळी वाजेपर्यंतदेखील ती मिळून आली नाही. अखेर मुलाकडच्या मंडळींनी फसवणूक झाल्याचा आरोप करीत मुलीच्या आई-वडिलांना एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेले. मुलगीच निघून गेल्यामुळे दोन्ही पक्षाचे हात बांधले गेले होते. रात्री उशिरापर्यंत या विषयावर कोणताच तोडगा निघाला नव्हता. 


मुलीला शोधून द्यावे

वर पक्षाच्या लोकांनी सर्वकाही घाई-घाईमध्ये केले. मुलीस जळगाव शहर माहित नव्हते. तिच्यासोबत काय घडले याचा तपास करून तिचा शोध घेण्यास त्यांनी मदत केली पाहिजे. आम्हाला पैसे दिल्याचा खोटा आरोप मुलाकडचे लाेक करीत आहेत. आमची मुलगी १८ वर्षांची पूर्ण नसताना देखील त्यांनी घाई करून लग्नाचा घाट घातला होता, असा आरोप मुलीच्या आई-वडीलांनी केला आहे. 


आमची फसवणूक केली 
वधूच्याआई-वडिलांनी संगनमताने मुलीस पळून जाण्यास मदत केली आहे. लग्नासाठी मुलीच्या घरच्यांना २० हजार रूपये दिले होते. लग्न झाल्यानंतर ३० हजार रूपये देण्याचे ठरले होते. त्या अाधीच मुलगी कशी पळून गेली? मुलीच्या घरच्यांनी आमची फसवणूक केली आहे, असा आरोप मुलाच्या घरच्यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...