आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीटी-२ बियाणांच्या दरात ६० रुपयांनी कपात; जळगाव जिल्ह्यासाठी २२ लाख पाकिटांची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- बीटी- २ या कापूस बियाणांचे दर यावर्षी ६० रुपयांनी कमी करण्यात अाले अाहे. ७४० रुपयांना ही बियाणे मिळणार अाहेत. जळगाव जिल्ह्यात २२ लाख बीटी बियाण्याच्या पाकिटांची मागणी अाहे. 


बीटी २ या तंत्रज्ञानाच्या बियाण्याच्या पाकिटाचे सुरुवातीचे दर ९३० रुपये हाेते. दाेन वर्षापूर्वी ते ८०० रुपये करण्यात अाले हाेते. यावर्षी शासनाने ही किंमत ७४० रुपये निर्धारित केली अाहे. बाेंडअळीच्या नियंत्रणासाठी कंपन्यांनी यावर्षी बीटी बियाण्यामध्ये येणारे रिफ्यूजी (नाॅन बिटी बियाणे) बीटी बियाण्यातच एकत्रित करून दिली असल्यामुळे ते शेतकऱ्यांना काढून फेकता येणार नाही. 


काेडमुळे हेराफेरी अशक्य 
जेनेटीक अायडेंटीफिकेशन काेडमुळे कंपन्यांना वाणाची हेराफेरी करता येणार नाही. तसेच बियाणे बाजारात येण्यापूर्वी कृषी विभागाकडून लाॅटनिहाय बियाण्यांचे सॅम्पल घेतले जाणार अाहे.

बातम्या आणखी आहेत...