आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गरज असेल त्याच ठिकाणी प्रभाग रचनेत बदल करणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- नागरिकांच्या नैसर्गिक ठिकाणानुसार आणि निकषानुसार प्रभाग रचना करण्यात आली आहे. मात्र, गरज असेल त्याच ठिकाणी बदल केले जातील,असे निवडणूक आयोग प्राधिकृत अधिकारी प्राजक्ता लवंगारे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेसंदर्भात हरकतींवर मनपात सुनावणी झाली. यात पहिल्याच दिवशी ३० हरकतदारांपैकी २६ जणांनी हजेरी लावली. यात विद्यमान नगरसेवकांसह सामान्य नागरिकांचीही उपस्थिती हाेती. या वेळी लवंगारे यांनी सहा ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणीही केली. 


सप्टेंबर महिन्यात हाेऊ घातलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक अायाेगाने एकेक प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरुवात केली अाहे. प्रभाग रचनेसंदर्भात हरकती व सूचना मागवल्यानंतर त्यावर सुनावणीचा दुसरा टप्पा गुरुवारपासून राबवण्यास सुरुवात झाली. पालिका अायुक्तांच्या कार्यालयात अायाेगाने प्राधिकृत केलेल्या सिडकाेच्या सहव्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता लवंगारे यांनी हरकतदारांशी संवाद साधला. सकाळी ११ वाजेपासून दुपारी ५वाजेपर्यंत सुनावणीचे काम सुरू हाेते. या वेळी पालिकेतील निवडणुकीच्या कामाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते. सुनावणीच्या निमित्ताने पाेलिस बंदाेबस्तदेखील नेमण्यात अाला हाेता. यात प्रत्येकी दाेन महिला व पुरुष कर्मचारी कार्यालयात थांबून हाेते. ९ एप्रिलपासून पालिकेत नाेंदवण्यात अालेल्या हरकतींच्या नाेंदीनुसार क्रमाने सुनावणीसाठी बाेलावण्यात येत हाेते. या वेळी हरकतदारांच्या स्वाक्षरी घेऊन त्याची नाेंद देखील ठेवण्यात अाली. 


बदल करताना परिणामांचा विचार करणार
महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात अालेली प्रारूप प्रभाग रचना ही निकषानुसार व नागरिकांच्या नैसर्गिक ठिकाणांचा विचार करून केली असल्याने याेग्य दिसते. प्रभाग रचनेसंदर्भात हरकतदारांचे म्हणणे एेकून घेण्यात अाले अाहे. 


ज्या ठिकाणी याेग्य असेल तिथे बदल केला जाईल. परंतु बदल करताना दुसऱ्या प्रभागावर त्याचा परिणाम हाेणार नाही याची काळजी घेतली जाईल. शक्यताे गरज असेल त्याच ठिकाणी बदल करू. झाेपडपट्टी भागातील मतदारांचे मतदान फाॅर्म ८ भरून स्थलांतरीत करता येईल,असे लवंगारे यांनी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 


सुनावणीचे व्हिडिअाे चित्रण 
सुनावणीसाठी स्वतंत्ररित्या हरकतदारांना अायुक्त कार्यालयातील काॅन्फरन्स हाॅलमध्ये बाेलावण्यात येत हाेते. ज्या प्रभागाशी संबंधित हरकत असेल त्या ठिकाणचा नकाशा प्राेजेक्टरवर गुगल मॅपव्दारे दाखविण्यात अाला. तसेच हरकतदारांचे सखाेल म्हणणे एेकून घेण्यात अाले.तसेच सभागृहातील प्रत्येक हालचालीचे व्हिडिअाे चित्रण करण्यात अाले. या वेळी अायाेगाने प्राधिकृत केलेल्या सिडकाेच्या सहव्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता लवंगारे, अपर जिल्हाधिकारी गाेरक्ष गाडीलकर, प्रांताधिकारी अभिजीत भांडे-पाटील, उपायुक्त चंद्रकांत खाेसे, लक्ष्मीकांत कहार, नगररचना विभागाचे रचना सहायक व अारेखक, प्रभाग रचना तयार करण्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते. 


या ठिकाणी स्पाॅट व्हिजिट 
निवडणूक अायाेगाने प्राधिकृत केलेल्या सिडकाेच्या सहव्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता लवंगारे यांनी सुनावणीनंतर दुपारी ५ वाजेच्या सुमारास प्रभागांची प्रत्यक्ष पाहणी केली. हरकतींच्या अनुषंगाने शाहूनगरातील इंदिरानगर, खान्देश मिल काॅलनी, व्दारकानगर, अादर्शनगरातील विश्वकर्मा हाैसिंग साेसायटी, पंचमुखी हनुमान मंदिराचा परिसर, तुकारामवाडी या भागात प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी सुभाष मराठे, सुहास चाैधरी, शकील शेख उपस्थित हाेते. 


रहिवास हुडकाेत अाणि मतदान शिवाजीनगरात 
दूध फेडरेशनजवळील झाेपडपट्टी स्थलांतर हाेऊन काही वर्ष झाली असून २६५ कुटुंब अाता पिंप्राळा हुडकाे येथे निवास करीत अाहेत. महापालिकेच्या घरकुल याेजनेत या झाेपडपट्टीवासीयांना निवारा उपलब्ध करून देण्यात अाला अाहे. परंतु अजूनही २६५ घरांमधील सुमारे १३०० लाेकांचे मतदान मात्र पूर्वीच्याच ठिकाणी अर्थात नव्याने निर्मित प्रभाग १ मध्ये अाहे. मतदानाच्या दिवशी सुमारे ७ ते ८ किमी लांब जावून मतदान करणे अशक्य असून हे मतदार मतदानापासून वंचित राहू शकतात. तसेच भविष्यात मतदान दुसरीकडे असल्याने हुडकाेतील रहिवासाच्या भागातील विकासावर परिणाम हाेऊ शकताे. त्यामुळे स्थलांतरीत नागरिकांचे मतदान हे प्रभाग १० मध्ये वळवावे, अशी सूचना इमात शब्बीर पिंजारी यांनी केली अाहे. त्यावर फाॅर्म क्रमांक ८ भरून मतदान स्थलांतरीत करण्याची सूचना करण्यात अाली. 

बातम्या आणखी आहेत...