आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग रचनेतील बदल उद्या जाहीर होणार; राजकीय कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पालिका निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रभाग रचनेत काय बदल झाले अाहेत? याबाबत राजकीय पक्षांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली अाहे. निवडणूक अायाेगाच्या निर्देशानुसार गुरुवारी प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध होणार अाहे. यामुळे हरकती व त्यावरील सुनावणीनंतर प्रभागांतील बदलासंदर्भात चर्चांना उधाण अाले अाहे.

 
मनपा निवडणुकीसाठी जुलै महिन्यात आचारसंहिता लागू हाेण्याची शक्यता अाहे. पालिकाेने विधानसभेच्या मतदार यादीनुसार प्रभागाच्या सीमेचा अभ्यास करून प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे काम हाती घेतले अाहे. सुनावणीनंतर झालेल्या निर्णयानुसार प्रभाग रचनेच्या अधिसूचना व नकाशामध्ये याेग्य ते बदल करून प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना २४ मे पूर्वी शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करावी लागणार अाहे. मंगळवारी दुपारपर्यंत उपायुक्त चंद्रकांत खाेसे प्रभाग रचनेसंदर्भात महत्त्वाच्या कामात गुंतलेे हाेते. बुधवारी १९ प्रभागांची अंतिम रचना अायाेगाकडून राजपत्रात प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता अाहे. यात प्रभाग रचनेतील नेमके बदल उघड हाेतील. हरकती व सूचनांप्रमाणे बदल हाेतात की नाही? याकडे तक्रारदारांचे लक्ष लागून अाहे. तसेच प्रभाग रचनेत ताेडफाेड झाल्यास कुणाच्या पथ्यावर जाईल, याबाबत तर्कवितर्क लावले जात अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...