आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांचे क्लिअरिंग हाऊस होणार हद्दपार; धनादेश अाॅनलाइन पद्धतीनेच वटणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- बँकेच्या क्लिअरिंग हाऊस (बँक समाशोधन गृह) मध्ये होणाऱ्या धनादेशाची आदान-प्रदान थांबणार असून आता थेट बँकांमध्येच ऑनलाइन पद्धतीने धनादेशाची प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत धनादेश वटवता येणार आहे. 


डिजिटलमुळे बँकिंग क्षेत्रामध्ये अनेक बदलाव होत आहे. त्यातलाच एक मोठा बदल लवकरच केला जाणार आहे. जळगावात धनादेश वटवण्यासाठी स्टेट बँकेच्या अधिपत्याखाली नवीपेठेत क्लिअरिंग हाऊस सुरू आहे. याठिकाणी ५६ बँकांचे कर्मचारी एकत्रित येऊन संबंधित बँकांचे धनादेश एकमेकांना देऊन प्रक्रिया पार पाडतात. सकाळी साडेदहा ते साडेअकरा आणि दुपारी साडेतीन ते पाच अशा वेळेत धनादेश वटवण्याची कार्यपद्धती चालते. मात्र, लवकरच संकल्पना हद्दपार होणार आहे. आता ती ईसीजी एस (एक्स्प्रेस चेक क्लिअरिंग सिस्टम) प्रणालीऐवजी सीटीएस (चेक ट्रकेंशन सिस्टम) प्रणालीद्वारे कामकाज होणार आहे. ही प्रणाली संगणकीकृत असल्याने संबंधित बँकेत संगणकावर धनादेशाचे विवरण येईल. वटवण्याची कार्यपद्धती अवलंबली जाईल. 


रिझर्व्ह बँकेकडून सूचना प्राप्त 
धनादेश वटवण्यासंदर्भातयंत्रणेचे काम अधिक सोपे झाले आहे. आता सायंकाळी पाच वाजतादेखील बँकेत धनादेश वटवता येणार आहे. या यंत्रणेसंदर्भात रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी यंत्रणेला सूचना केल्या असून बँकांनी तयार रहावे, असे आदेश दिले आहे. 
- तुषार भोईर, सहायक महाप्रबंधक-स्टेट बँक 

 

पाच राज्यांतील धनादेशही दुसऱ्या दिवशी वटणार 
वेस्टर्न ग्रीड बँकर्स क्लिअरिंग हाऊस अंतर्गत पहिल्या टप्यात पाच राज्य जोडले जाणार आहेत. या पाचही राज्यातील बँकांचे धनादेश संगणकावर दिसणार आहे. त्यामुळे गुजरात अथवा गोव्यातील धनादेश असेल तर तो ऑनलाइन पद्धतीने वटवण्याची प्रक्रिया होणार आहे. पूर्वी इतर राज्याचा धनादेश असल्यास ताे संबंधित बँकेला पोस्टाने पाठवला जायचा. त्यासाठी किमान आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागायचा. त्यामुळे खातेदाराच्या खात्यावर उशिरा पैसे जमा हाेत हाेते. आता हा धनादेश नव्या प्रणालीने दुसऱ्या दिवशी वटणार आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश या ग्रीडमध्ये जोडली गेली अाहे. 

बातम्या आणखी आहेत...