आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांनी केले जिल्हा बँकेचे अभिनंदन; कर्जमाफीच्या कामातील अव्वल कामाचे काैतुक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये जळगाव जिल्हा सहकारी बँकेने राज्यात सर्वात चांगले काम केले आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात जळगाव जिल्हा बँकेने लाख ७१ हजारांची कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात कर्जमाफीच्या विषयावर सभागृहात बाेलताना दिली. 


कर्जमाफी योजनेत राज्यातील इतर सहकारी बँकांच्या तुलनेत जळगाव जिल्हा बँक कर्जमाफीच्या कामात पहिल्या क्रमांकावर राहिली, कर्जमाफीच्या कामकाजामध्ये जळगाव बँकेने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला. सरकारने दिलेला सर्व निधी बँकेने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. त्यांनी माजी मंत्री खडसे यांच्या कामाचा उल्लेख केला. 


रक्कम तत्काळ जमा 
शासनाकडून प्राप्त झालेली रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे. यासाठी अध्यक्ष संचालक मंडळाच्या सूचनेनुसार सर्व यंत्रणा प्राधान्याने कामाला लागली अाहे. कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा केल्यानंतर सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना कळवले जात आहे. 
- जितेंद्र देशमुख, कार्यकारी संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँक जळगाव 

बातम्या आणखी आहेत...